Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    लातूरला स्वतःची जहागीर समजणाऱ्यांना धडा शिकवा - केंद्रीय मंत्री पीयुष गोयल



     लातूरला स्वतःची जहागीर समजणाऱ्यांना धडा शिकवा  

      - केंद्रीय मंत्री पीयुष गोयल

         लातूर/प्रतिनिधी:जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत १५ वर्ष पदे उपभोगली.आता लातूर मतदारसंघात अभिनेत्यांना फिरवून,फेक नरेटिव्हचा आधार घेत अपप्रचार सुरू आहे.खोटी आश्वासने,भडकाऊ भाषणे आणि समाजात भांडणे लावून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे.विकासकामे न करता लातूरला जहागीर समजणाऱ्या आमदारांना त्यांची जागा दाखवून द्या,असे आवाहन केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी केले.
       लातूर शहर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित उद्योगपती व व्यापाऱ्यांच्या संवाद मेळाव्यात पीयुष गोयल बोलत होते.मंचावर आ.अमित गोरखे,उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर,भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, अविनाश कोळी,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रामदास भोसले,नंदू अग्रवाल,सीए संजय अग्रवाल,प्रदीप सोळंकी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
        यावेळी बोलताना पीयुष गोयल म्हणाले की,महाविकास आघाडी महाराष्ट्राला विनाशाकडे नेण्याचे काम करत आहे.ही महाविकास नव्हे तर महाविनाश आघाडी आहे.फेक नरेटिव्ह पसरवून अपप्रचार करण्याचे काम आघाडीकडून केले जात आहे.लातूर मतदारसंघात अभिनेत्यांना आणून जनतेचे मनोरंजन केले जात आहे.खोटी आश्वासने देत दिशाभूल करून, भाषणातून माथी भडकवण्याचे काम सुरू आहे.समाजा- समाजात,जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम केले जात आहे. जे काम आपल्याला करता आले नाही त्याचे खापर इतरांच्या माथ्यावर फोडण्याचे काम सुरू असल्याचेही पीयुष गोयल यांनी सांगितले.
        राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचे अंदाज विविध सर्वेक्षणातून व्यक्त झाले आहेत. लातूर मतदारसंघात महायुतीने एक उच्चशिक्षित व कर्तृत्ववान महिला उमेदवार दिला आहे. लातूरच्या विकासाचा आवाज बुलंद करण्यासाठी या उमेदवाराच्या पाठीशी रहा. त्यासाठी उर्वरित ६ दिवस महायुतीला द्या.मतदारसंघात ८०  टक्के मतदान करून घ्या.अमित देशमुख व धीरज देशमुख यांना पराभूत करून जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना धडा शिकवा,असे आवाहनही पीयुष गोयल यांनी केले.
        लातूरकडे ८ वर्ष राज्याचे नेतृत्व होते.त्याच मुख्यमंत्र्यांची दोन्ही मुले आमदार आहेत.तरीही लातूरचा विकास झाला नाही. व्यापार-उद्योगाच्या समस्या कायमच राहिल्या. त्यांच्या निराकरणासाठी आमदारांनी काम केले नाही.रेल्वे सारख्या महत्त्वाच्या प्रश्नावरही मंत्र्यांना भेटण्यास आमदारांना वेळ मिळाला नाही.मुख्यमंत्री असताना देशमुख यांनी मराठवाड्यासाठी एक तरी मोठा प्रकल्प आणला का ? असे सवाल करत भाजपचे नेते माझ्याकडे आल्यामुळेच रेल्वे बोगी प्रकल्प मंजूर केला.आपण यावेळी डॉ.चाकुरकर यांना निवडून द्या.त्या मुंबई व दिल्लीतून आपल्यासाठी प्रकल्प खेचून आणतील,असेही पीयुष गोयल म्हणाले.
        यावेळी मनोगत व्यक्त करताना उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी लातूर हे मराठवाड्यातील एक मोठे व्यापार व उद्योग केंद्र आहे असे सांगत रेल्वे कोच फॅक्टरी लातूरसाठी दिल्याबद्दल पीयुष गोयल यांचे आभार मानले.या प्रकल्पात अजून उत्पादन सुरू झाले नसून ते लवकर सुरू व्हावे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे २५० सह प्रकल्प लातूर एमआयडीसीत व्हावेत,अशी मागणी केली.यातून येथील तरुणांना उद्योग उभारता येतील. लातुरची अर्थव्यवस्था गतिमान होईल,असे ताई म्हणाल्या. लातूर मधून मोठ्या प्रमाणात जीएसटी व आयकर भरला जातो परंतु त्याच्याशी संबंधित कार्यालय नांदेड येथे आहे.ते लातूर येथे हलवावे.लातूर येथे मोठा उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत,आदी मागण्या केल्या.
            रामदास भोसले यांनी या मेळाव्याचे प्रास्ताविक केले.या मेळाव्यास जितेश चापसी,दिनेश गिल्डा,मुस्तफा शेख,विशाल अग्रवाल,भारत माळवदकर, फय्याज पटेल यांच्यासह शैलेश गोजमगुंडे,ॲड.दिग्विजय काथवटे व शहरातील उद्योजक, व्यापारी,सीए आणि विविध समाज घटकातील मान्यवर,
    महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad