गुजराती समाजाने शहराच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलला
अमित विलासराव देशमुखगुजराती समाज स्नेह मेळावा संपन्न
लातूर (प्रतिनीधी) : रवीवार दि. ३ नोव्हेंबर २४
लातूर येथील गुजराती समाजाने शहराच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलला आहे.
लातूरच्या जडणघडणीत या समाजाचे योगदान मोठे आहे. शांतताप्रिय असलेला हा
समाज कधीच काही मागत नाही उलट सामाजिक कार्यात तो नेहमी आघाडीवर असतो अशी
भावना लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत
उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली,
शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेली शांतता आणि सामाजिक सलोखा कायम
राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील अशी ग्वाही याप्रसंगी बोलताना
त्यांनी दिली.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत
उमेदवार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. 3
नोव्हेंबर 24 रोजी सकाळी लातूर शहरातील मार्केट यार्ड जवळील कोरे गार्डन
येथे गुजराती समाज लातूरच्या वतीने नूतन वर्षानिमित्त आयोजित करण्यात
आलेला गुजराती समाज स्नेह मेळावा संपन्न झाला.
यावेळी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा गुजराती समाज
लातूरचे अध्यक्ष ललितभाई शहा, गुजराती शिक्षण संस्था लातूरचे अध्यक्ष
कमलेश ठक्कर, उपाध्यक्ष श्यामजीभाई पटेल, अतुल ठक्कर, अशोक गोविंदपुरकर,
अजय शहा, लितेश शहा आदिसह गुजराती समाज बांधव भगिनी उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर येथील गुजराती
समाजाने लातूरच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलला आहे, त्यांनी केलेली
प्रगती उल्लेखनीय आहे. लातूरच्या जडणघडणीत न विसरणारे योगदान या समाजाने
दिले आहे. या समाजाने कधी काही मागितले नाही नेहमी देण्याचा प्रयत्न केला
आजच्या दिवशी रूढी परंपरेनुसार गुजराती समाज एकत्र येतो चांगल्याला
चांगले म्हणणे ही आपली संस्कृती आहे. आजवर लातूरची प्रगती ही
लातूरकरामुळे झाली आहे असे त्यांनी सांगितले.
---

No comments:
Post a Comment