Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    येणारा काळ इलेक्ट्रिक वाहनांचाच असणार आहे : राजकुमार पल्लोड




     येणारा काळ  इलेक्ट्रिक वाहनांचाच 

    असणार आहे : राजकुमार पल्लोड 
    लातूर : पुढील काळ इलेक्ट्रिक वाहनांचाच असणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी येणाऱ्या काळात नागरिक अन्य वाहनांपेक्षा  इलेक्ट्रिक वाहनांचाच प्रथम पसंती देताना दिसतील ,असे प्रतिपादन लातूर जिल्हा माहेश्वरी महासभेचे अध्यक्ष राजकुमार पल्लोड यांनी केले. 
                         लातूर शहरातील कामदार रोडवरील स्वरा इलेक्ट्रिक मोटर्सचा  उद्घाटन सोहळा   राजकुमार पल्लोड, जिल्हा माहेश्वरी महासभेचे सचिव फुलचंद काबरा, ओएसएम कंपनीचे वेस्टर्न झोनल मॅनेजर अशद इद्रिस,  सेल्स मॅनेजर परेश मोरे, पुणे येतील सीए शाम सारडा, सुरेश लद्दड, राजकुमार छापरवाल,  रामेश्वर भराडिया, विनोद गिल्डा, किरिट  चापसी, सचिन जाखडे, संतराम भांदरगे  आदी  मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी थाटात पार पडला. त्यावेळी राजकुमार पल्लोड आपले विचार व्यक्त करत होते. यावेळी बोलताना  ते पुढे म्हणाले की , वाढत्या प्रदुषणाचा  पर्यावरणावर खूप अनिष्ट परिणाम होत आहे.  प्रदूषण कमी करण्याचा रामबाण उपाय म्ह्णून ई व्हेकल्सचा पर्याय समोर आला आहे. पुढील दहा वर्षात आपल्याला सगळीकडे इलेक्ट्रिक वाहनेच बघायला मिळणार आहेत. वाढत्या महागाईत इंधनाचे दरही आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे ग्राहकवर्ग निश्चितच इलेक्ट्रिक वाहनांकडे  मोठ्या संख्येने वळताना दिसत आहेत. ग्राहकांची ही गरज स्वरा मोटर्सच्या माध्यमातून पूर्ण होईल,असा विश्वास व्यक्त करून पल्लोड यांनी स्वरा मोटर्स परिवाराला हार्दिक शुभेच्छा दिल्या. 
    ओएसएम कंपनीचे वेस्टर्न झोनल मॅनेजर अशद इद्रिस यांनी यावेळी बोलतांना  अन्य इलेक्ट्रिक वाहनांच्या  तुलनेत ओएसएम कंपनीची वाहने किती सक्षम आहेत याविषयी सविस्तर माहिती दिली. ओएसएम कंपनीचे हरियाणात तीन आणि महाराष्ट्रात एक प्लांट असून आपल्या  कंपनीच्या माध्यमातून विक्री केल्या जाणाऱ्या सर्व वाहनाचे स्पेअर पार्टस भारतातच तयार केले जातात,असे सांगितले. ग्राहकांना वर्षाचे ३६५ दिवस अखंडितपणे सेवा देण्याचे काम आपल्या कंपनीमार्फत केले जाणार आहे. आपल्या कंपनीची इलेक्ट्रिक वाहने निश्चितच  ग्राहकांच्या पसंतीस उतरतील,असा विश्वासही इद्रिस यांनी यावेळी व्यक्त केला. फित  कापून व दीप प्रज्वलन करून स्वरा मोटर्सचे उद्घाटन करण्यात आले. राजकुमार छापरवाल , श्रीकांत छापरवाल, शाम सारडा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad