Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या भाच्यावर गोळीबार? दिवसभरातील ताज्या घडामोडी

     दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका  क्लिकवर ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk  



    💁‍♂️ आज राज ठाकरे यांची तोफ धडाडणार


    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची तोफ आज (27 नोव्हेंबर) पुन्हा धडाडणार आहे. मुंबईतील नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. मे महिन्यात राज यांनी औरंगाबादला सभा घेतली होती. त्यानंतर काही दिवसांत राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यामध्ये नवीन शिंदे-फडणवीस सरकार आलं. त्यावेळी राज यांच्या निशाण्यावर मशिदीवरील भोंगे आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याचे पाहायला मिळाले. आजच्या सभेत कोण निशाण्यावर असणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


    🗣️ संजय राऊत म्हणाले, कोश्यारींवर अजून कारवाई का नाही? 


    भारतीय जनता पक्षाकडून वारंवार शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. राज्यपाल कोश्यारींवर अजूनही भाजपने कारवाई का केली नाही, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. तर शिवाजी महाराजांविषयी श्रध्दा असणाऱ्यांनी सर्वांनीच एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही राऊत यांनी केले.


    😎 कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या भाच्यावर गोळीबार?


    पुण्यातील कोंढवा परिसरातील बोपदेव घाटातून जात असताना राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या भाच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली. ही घटना घडल्यानंतर अज्ञातांकडून माझ्यावर गोळीबार केल्याची माहित अब्दुल सत्तातरांचे भाचे आसिफ खान यांनी दिलीय.


    👁️ पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंप...!


    पाकिस्तानमधून राजकारणातील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी एक मोठी घोषणा केली आहे. विधीमंडळातील ‘पीटीआय’च्या सर्व जागा सोडण्याचा निर्णय खान यांनी जाहीर केला आहे. आपल्या देशाचे नुकसान करण्याऐवजी ही भ्रष्ट व्यवस्था सोडून जाणेच योग्य आहे”, असे खान यांनी म्हटले आहे.


    🏏 पावसाचा खेळ, भारत-न्यूझीलंड सामना रद्द


    भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा वनडे रविवारी पाऊस आणि खराब हवामानामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे भारताचे मोठे स्वप्न भंगले. या सामन्यात केवळ 12.5 षटकांचा खेळ करता आला. पावसामुळे वारंवार त्रास होत असल्याने सामना अधिकाऱ्यांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता 30 नोव्हेंबरला मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना क्राइस्टचर्चच्या हॅगली ओव्हल मैदानावर खेळवला जाईल.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad