Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    केजरीवालांनी मुस्लिमांना संपूर्ण देशात बदनाम केलं; ओवैसी

     

    केजरीवालांनी मुस्लिमांना संपूर्ण देशात बदनाम केलं; ओवैसी 





    Gujarat Legislative Assembly Election 2022: गुजरातमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी आक्रमक शैलीमध्ये अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केलं आहे.
    गुजरातेतल्या विधानसभेच्या १८२ जागांमध्ये बहुमतासाठी ९२ जागांची गरज असते. २०१७मध्ये भाजपने ९९ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसने ७७ जागांवर. ६ जागांवर अपक्षांनी बाजी मारलेली. मध्य गुजरातमध्ये ६८ जागा आहेत. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ५४, उत्तर गुजरातमध्ये ३२ आणि दक्षिण गुजरातमध्ये २८ विधानसभा मतदारसंघ आहेत.

    सध्या भाजप, काँग्रेस आणि आप या पक्षांनी गुजरातचं मैदान गाजवलं आहे. यातच आता एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी थेट अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांना खोटारडं म्हणत, केजरीवालांनी मुस्लिमांना देशात बदनाम केल्याचा ठपका ठेवला.

    ''जेव्हा देशात कोविड आला, तेव्हा सर्वात अगोदर मुस्लिमांना बदनाम करण्यात आलं. तबलिगी जमातीला लक्ष्य केलं गेलं. जहांगीरपुरीमध्ये गोंधळ झाल्यानंतर तिथे बुलडोजर चालवण्यात आला.'' असं ओवैसी म्हणाले.

    ओवैसी गुजरातमध्ये ठाण मांडून

    गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने ओवैसी गुजरातमध्ये ठाण मांडून आहेत. या राज्यात मुस्लिमांची संख्या ९ टक्के आहे. मात्र भाजपने एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलेलं नाही. तर काँग्रेसने १८२ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ ६ मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलंय. आम आदमी पक्षाने फक्त दोन मुस्लिमांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे ओवैसी गुजरातमध्ये ठाण मांडून आहेत.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad