राष्ट्र सेवा दला तर्फे बाल दिन साजरा
मालेगाव (प्रतिनिधी)- येथील राष्ट्र सेवा दल मालेगाव शाखेच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बाल दिन साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय, संगमेश्वर येथे आयोजित बालदिन कार्यक्रमात जेष्ठ सेवा दल सैनिक अशोक पठाडे, संस्था चेअरमन सुनील वडगे, जेष्ठ सेवा दल सैनिक रविराज सोनार, तालुका संघटक सारंग पाठक, मुख्याध्यापिका वंदना शिंदे यांचे हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सेवा दल जिल्हा संघटक नचिकेत कोळपकर यांनी मुलांशी संवाद साधला. तसेच सुवर्णा अहिरे यांनी पंडित नेहरू यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या वेळी जेष्ठ सेवा दल सैनिक कचेश्वर बारसे, नांदगाव यांचे कडून सेवा दलाच्या पणती उपक्रमा अंतर्गत साधना बाल कुमार अंक मुलांना भेट देण्यात आले. कार्यक्रम अध्यक्ष अशोक पठाडे यांनी अध्यक्षीय भाषण केले. सूत्र संचालन श्रेयशा वाघ यांनी केले, आभार प्रदर्शन कीर्ती पगारे यांनी केले. याप्रसंगी राष्ट्र सेवा दल सैनिक राजीव वडगे, रविराज सोनार, तालुका संघटक सारंग पाठक, जिल्हा संघटक नचिकेत कोळपकर, माजी पर्यवेक्षक एच एस मंडळ, प्रा अनिल महाजन, राजेंद्र आहिरे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना शिंदे आदींसह शिक्षक उपस्थित होते. शेवटी सर्वानी जोडो जोडो भारत जोडो या घोषणा दिल्या.
No comments:
Post a Comment