खून करणाऱ्याला भरचौकात फासावर लटकवा - latursaptrangnews

Breaking

Wednesday, November 16, 2022

खून करणाऱ्याला भरचौकात फासावर लटकवा

 


🚀 नासाचे मून मिशन 'आर्टेमिस-1' यशस्वीरित्या लॉंच :


यूएस स्पेस एजन्सी 'नासा' मून मिशन 'आर्टेमिस-1' यशस्वीरित्या लॉंच केले आहे. हे प्रक्षेपण आज फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून करण्यात आले आहे. नासाचा हा तिसरा प्रयत्न आहे.आर्टेमिस-1 ही मोहीम नासाच्या मंगळ मोहिमेनंतरची सर्वात महत्त्वाची मोहीम आहे. नासा या मिशनच्या माध्यमातून ओरियन अंतराळयान चंद्रावर पाठवत आहे. हे यान 42 दिवसांत चंद्रावर प्रवास केल्यानंतर परत येईल. अमेरिकेच्या 50 वर्षांपूर्वीच्या अपोलो मिशननंतर प्रथमच अंतराळवीरांना चंद्रावर नेण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.


😊 जॉन्सन अॅण्ड जॉन्सनला हायकोर्टाचा अशंत: दिलासा :


जॉन्सन अँड जॉन्सनला ृहायकोर्टानं अशंत: दिलासा देत त्यांचं बंद केलेलं 'बेबी टाल्कम पावडर'चं उत्पादन सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र हे उत्पादन तुमच्या जोखीमीवर सुरू करा, एफडीनं लावलेली विक्री आणि वितरणावरील बंदी 30 नोव्हेंबरपर्यंत कायम राहील असं हायकोर्टानं आपल्या आदेशांत स्पष्ट केलं आहे. तसेच तीन नव्या प्रयोगशाळेत तीन दिवसांत नमुन्यांची नव्यानं तपासणी करत आठवड्याभरात त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.


🔎 विनायक मेटे मृत्यूप्रकरणी सीआयडीच्या हाती सबळ पुरावे :


शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांच्या मृत्यूप्रकरणात सीआयडीच्या हाती सबळ पुरावे आले आहेत. त्यानंतर सीआयडीने विनायक मेटे यांचा वाहन चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. रसायनी पोलीस स्टेशनमध्ये कलम 304 (2) नुसार या गुन्ह्याची नोंद झाली आहे. सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तपासात विनायक मेटेंची गाडी ज्या मार्गाने गेली त्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले. 




🗣️ खून करणाऱ्याला भरचौकात फासावर लटकवा'* :


श्रद्धा वालकर खून प्रकरणावर आज पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. श्रद्धाचा खून करणाऱ्याविरोधात खटलाही चालवू नका. त्याला भरचौकात थेट फासावर लटकवा, असे राऊत म्हणाले. संजय राऊत म्हणाले, श्रद्धासोबत जी घटना घडली, ती अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. श्रद्धा आणि आफताबला कपल म्हणता येणार नाही.


🏏 स्टोक्ससाठी एकदिवसीय संघाचे दरवाजे उघडे; प्रशिक्षकांची ऑफर :


ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेत बेन स्टोक्स इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. यामुळं आगामी एकदिवसीय विश्वचषकात बेन स्टोक्स इंग्लंडच्या संघाचा आधारस्तंभ म्हणून समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पण ज्यावेळी स्टोक्सनं एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तेव्हा प्रशिक्षक मॅथ्यू मॉटनं त्याच्यासाठी कधीही एकदिवसीय संघाचे दरवाजे उघडे असल्याची त्याला ऑफर दिली होती.

No comments:

Post a Comment