Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    सकाळच्या टॉप घडामोडी



     अखेर रामदेव बाबांचा माफीनामा: महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरण; महिला आयोगाने बजावली होती नोटीस


    ▪️ MPतून भारत जोडो यात्रा: राहुल गांधी म्हणाले- माझी प्रतिमा खराब करण्यासाठी भाजपकडून करोडोंचा खर्च, म्हणजेच मी योग्य काम करतोय


    ▪️ पंजाबचे मुख्यमंत्री मान यांचे फर्मान: मंत्री, आमदार आलिशान हॉटेलमध्ये राहणार नाही; त्यांना शासकीय गेस्ट हाऊसमध्ये राहावे लागेल


    ▪️ गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का: भाजपचे ज्येष्ठ नेते जयनारायण व्यास यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, तिकीट कापल्यामुळे होते नाराज


    ▪️ ट्विटर शब्दमर्यादा वाढवणार: लवकरच तुम्ही 420 शब्दांमध्ये ट्विट करू शकणार; मस्क यांनी यूजरला उत्तर देताना सांगितले


    ▪️ सामान्यांसाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे दरवाजे अजूनही बंद: सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत प्रवेश नाही, 2 वाजेपर्यंत माध्यमांनाही बंदी


    ▪️ उपमुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप: मविआने विमा कंपन्यांना एका वर्षात 3 हजार कोटी रु. दिले, उद्धव ठाकरे आता एक्सपोझ झालेत


    ▪️ राजकारण म्हणजे मिमिक्री नाही: संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले- ओरिजनल जॉनी लिव्हर असताना तुम्हाला कशाला पाहू


    ▪️ महापुरुषांचा अवमानही देशद्रोहच ठरवा: उदयनराजेंची मागणी; म्हणाले - अपमान करणाऱ्यांना देशद्रोहाच्या कायद्यानुसार शिक्षा व्हावी


    ▪️ नाशिकमधील धक्कादायक प्रकार: ज्ञानदीपच्या संस्थाचालकाने आणखी 7 मुलींवर अत्याचार केल्याचे उघड, 10 वर्षांपासून शोषण


    ▪️ ऋतुराजने एका षटकात ठोकले 7 षटकार: अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज, विजय हजारे ट्रॉफीमध्ये ठोकले द्विशतक


    ▪️ राणादा-अंजलीबाईच्या लग्नविधींना सुरुवात: अक्षयाच्या घरी पार पडली ग्रहमख पूजा, हार्दिकच्या घरी झाले केळवण


    ▪️ रोहित शेट्टीच्या 'सर्कस'चा टिझर रिलीज: जबरदस्त कॉमेडीचा तडका लावताना दिसले स्टार्स, 2 डिसेंबरला येणार ट्रेलर

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad