Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    आरोग्यमंत्र्यांच्या महाशिबिरात गोंधळात गोंधळ; रुग्णांना ना जेवण, ना नाष्टा

     


    आरोग्यमंत्र्यांच्या महाशिबिरात गोंधळात गोंधळ; रुग्णांना ना जेवण, ना नाष्टा


    उस्मानाबाद : परांडा येथील कोठला मैदानावर आयोजित केलेल्या महाशिबिरात हजारो नागरिकांनी तपासणीसाठी गर्दी केली होती. मात्र आलेल्या रुग्णांला ना जेवण ना नाष्टा मिळाला. शिवाय रुग्णांची साधी तपासणीही झाली नाही. औषधं गोळ्या नाही अन् प्यायला पाणीही मिळाले नाही. यामुळे महिला रुग्णांचे प्रचंड झाल झाल्याचं समोर आलंय.

    राज्याचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी मोठा गाजावाजा करत ५ लाख नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. मात्र काल आणि आज मिळुन केवळ ३२ ते ३३ हजार नागरिकांची तपासणी या आरोग्य शिबिरात झाल्याचं सांगितलं जातंय.

    मोफत आरोग्य तपासणी असल्यामुळे हजारो नागरिकांनी या शिबिराला हजेरी लावली होती. अचानक रुग्ण वाढल्यामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली. तसेच चेंगराचेंगरी झाली असून ४ वयस्कर महिला ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची अफवा यावेळी कोणीतरी पसरवली. यामुळे एकच गोंधळ झाला. या गोंधळामुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. पण प्रशासनाने वेळीच दक्षता घेतल्यामुळे ही दुर्घटना टळली, असं सांगितलं जातंय. तर चेंगराचेंगरी सारखी कुठली ही घटना झाली नसल्याचं पोलीस प्रशासन सांगितलं.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad