Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    किनगाव पोलीसात अज्ञाताविरोधात गुन्हा



     लातूर : अहमदपुर तालुक्यातील किनगाव येथील आठवडी बाजारातून, म्हैस खरेदीसाठी यादव खोबराजी मुरकुटे हे आले असता; त्यांना म्हैस पसंद पडली नसल्याने.! ते त्यांच्या मुळ गावाकडे जाण्याकरीत बसमध्ये चढताना खीस्सा कापून 70 हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे.

    फिर्यादी यादव खोबराजी मुरकुटे वय - ७० वर्षे रा.मुरकुटवाडी ता.अंबेजोगाई हे दि.३० नोव्हेंबर रोजी आठवडी बाजारातून म्हैस खरेदी करण्यासाठी ७०,००० हजार रुपये घेऊन आले. म्हैस पसंद न पडल्याने गावी जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना बनियनच्या डाव्या खिशातील ठेवलेले ७०,००० / हजार रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने खिशा कापून चोरून नेले. यानंतर किनगाव पोलीसात अज्ञाताविरोधात गुन्हा र.नं २९० / २०२२ कलम ३७९ भादवी प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad