Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    राज्यात गोवरचा उद्रेक, टास्क फोर्सची स्थापना दिवसभरातील ताज्या घडामोडी



     राज्यात गोवरचा उद्रेक, टास्क फोर्सची स्थापना :


    राज्यातील गोवर आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 11 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना होणार आहे. ज्याप्रकारे कोरोना काळात टास्क फोर्सने वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर लक्ष दिलं होतं, मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या, त्याचप्रकारे गोवर साथीच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची 11 सदस्यीय टीम स्थापन होणार आहे. या टास्क फोर्सच्या टीममध्ये संसर्गजन्य रोग तज्ज्ञांचा समावेश असेल. टास्क फोर्सच्या स्थापनेनंतर वेळोवेळी बैठका होतील आणि वाढती रुग्णसंख्य नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.  


    😎 'गद्दारांची पोरं हातावर 'मेरा बाप चोर है' लिहितील' :


    शिवसेना सोडून गेलेल्या 40 आमदार आणि 12 खासदारांची पोरं हातावर मेरा बाप चोर हे लिहितील, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी शिंदे गटावर जहरी टीका केली आहे. शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदार गेले, मात्र शिवसेना पक्ष तिथेच आहे. स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका राज्य सरकार टाळते आहे, ते केवळ भीतीपोटी टाळत आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे.


    🗣️ राज ठाकरेंचा आरोप हास्यास्पद - अजित पवार :


    राज्याच्या राजकारणात राज ठाकरेंनी शरद पवारांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच जातीपातीचं राजकारण होत आहे, असा आरोप पुन्हा एकदा मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. राज ठाकरेंचे आरोप बिनबुडाचे असून त्या आरोपांमध्ये नखभरसुध्दा तथ्य नसल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. शरद पवारांवर बोललं की, बातमी होते, राज ठाकरेंनी असं वक्तव्य करणं योग्य नाही.


    🏴 राज्यपालांना काळे झेंडे दाखवणं महागात :


    राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या युगातील आदर्श आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ते आज पुणे दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी गोंधळाचं वातावरण निर्माण केलं होतं. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. राजभवन परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे वाहतूक कोंडी देखील झाली आहे. 


    ❤️ राणादा-पाठकबाई अडकले लग्नाच्या बेडीत :


    'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरांत पोहचलेले राणादा आणि पाठकबाई अर्थातच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आज लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. पुण्यात दोघांचा विवाहसोहळा संपन्न होतोय. सकाळी त्यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली असून दोघांनी सप्तपदी घेतल्या आहेत. लग्नात दोघेही पारंपरिक रुपात अतिशय सुंदर दिसत आहेत. नऊवारीत अक्षयाचे सौंदर्य खुलून आले आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad