भारतीय लोकशाही समोरील आव्हाने युवकांनी समजवून घेणे गरजेचे- सागर शिंदे



 भारतीय लोकशाही समोरील आव्हाने युवकांनी समजवून घेणे गरजेचे- सागर शिंदे


लातूर /प्रतिनिधी:भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे.असे असले तरी आपल्या लोकशाही समोर अनेक आव्हाने आहेत.युवकांनी ही आव्हाने समजून घेतली पाहिजेत,असे मत सागर शिंदे यांनी व्यक्त केले.
    भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई,भारत भारती, विद्याभारती,शिक्षण विवेक, विज्ञान भारती,क्रीडा भारती,  ERA एज्युकेशन रिसर्च असेम्ब्ली पुणे,विद्याभारती,अखिल भारतीय शिक्षण संस्था दिल्ली,भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्री केशवराज शैक्षणिक संकुल, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्र चेतना शिबिरात युवा चेतना सत्रात 'संविधानावर आधारित व्हिडिओ व लोकशाहीसमोरील आव्हाने 'या विषयावर शिंदे यांनी विवेचन केले. 
    विद्यार्थ्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे.समानता राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे याची माहिती देत व्हिडिओच्या साह्याने संविधान प्रश्नमंजुषा त्यांनी दाखवली.ते म्हणाले की,३८९ सदस्य संविधान तयार करण्यासाठी होते.संविधान सभेत १५ महिला सदस्याही होत्या.संविधान इंग्रजी भाषेत लिहिले.त्याचा हिंदी भाषेत अनुवाद केला गेला.संविधानाची एकूण २२भाग,३९५ अनुच्छेद व आठ परिशिष्टे होती.
सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकशाहीसमोर जातीयवाद, सांप्रदायिकता,फुटीरतावाद, आतंकवाद,भाषावाद,नक्षलवाद या आव्हानाला देशाला सामोरे जावे लागत आहे.दृकश्राव्य साधनाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची भूमिका स्पष्ट केली . 
    समारोप सत्र प्रसंगी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिबीर संयोजक नितीन शेटे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत राहुल गायकवाड,सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन श्रीमती रिता सहस्त्रबुद्धे यांनी केले. 
    याप्रसंगी शिबीर संयोजक नितीनभाऊ शेटे,समन्वयक राहुल गायकवाड,शिबीर कार्यशाळा प्रमुख नागेश जाधव, महाव्यवस्थापक जितेंद्र जोशी, शिबीर प्रमुख गुरुनाथ झुंजारे आदीमान्यवर,शिक्षक व अन्य महाविद्यालयातील युवक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post