दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंच्या हत्येचा कट रचलेला, माजी पीएचा खळबळजनक आरोप - latursaptrangnews

Breaking

Wednesday, December 28, 2022

दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंच्या हत्येचा कट रचलेला, माजी पीएचा खळबळजनक आरोप

 


दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंच्या हत्येचा कट रचलेला, माजी पीएचा खळबळजनक आरोप


अहमदनगर : अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यानं पुन्हा आरोप केले आहेत. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी आरोप केले आहेत. दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट मधून होणारे व्यवहार सर्व बेकायदेशीर असून त्यांच्याकडे येणारा पैसा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा असल्याचा गंभीर आरोप दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला. भाऊसाहेब शिंदे यांनी दीपाली सय्यद यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला. दीपाली सय्यद यांनी यासंदर्भातील आरोप फेटाळले आहेत.


अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले यांनी ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपालांच्या हस्ते पुरस्काराही दिले होते. ५० लोकांना ५० हजारांचे चेक देण्यात आले होते. हे चेक बनावट असल्याचा आरोपही शिंदे यांनी केलाय. विशेष म्हणजे दीपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सातशे ते आठशे कोटी रुपयांचा व्यवहार झाला हा सर्व पैसा आला कोठून याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. राज्य सरकारने आपल्याला संरक्षण दिल्यास दीपाली सय्यद यांचे दाऊदसोबत असलेल्या संबंधांचे सर्व पुरावे आपण शासनाला आणि माध्यमांना देऊ, असं शिंदे यांनी सांगितले.



राज ठाकरे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप


भाजपचे खासदार बृज भूषण शरण सिंग यांच्या भेट घेऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची हत्या करण्याचा कट दीपाली सय्यद यांचा होता असाही आरोप शिंदे यांनी केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची हत्या घडवून आणण्याचा सय्यद यांचा कट असल्याची खबळजनक आरोपही शिंदे यांनी केला. अयोध्या दौऱ्यात भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांना सय्यद उचकावत होत्या, यासाठी त्यांना एका मोठ्या नेत्याचा आधार होता, असा आरोपही शिंदे यांनी केला.



आरोपांवर दीपाली सय्यद काय म्हणाल्या?

मी कोणी मोठी नाही की घोटाळे करु शकेन. मला त्या व्यक्तीवर काही बोलायचं नाही. पाकिस्तान दुबई कनेक्शन असल्याचा आरोप केलाय त्यावर काय बोलायचं, असा सवाल दीपाली सय्यद यांनी केला. दीपाली सय्यद नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.

No comments:

Post a Comment