दिवसभरातील ताज्या घडामोडी
😎 कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांना फडणवीसांनी सुनावलं :
मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी कर्नाटकच्या मंत्र्यांनी केल्यानंतर आज याचे पडसाद विधानसभेत त्याचे पडसाद उमटले आहेत. कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एस अश्वथ नारायण यांच्या निर्णयाचा विधानसभेत निषेध करण्यात आला असून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मुंबई महाराष्ट्राची असून कोणाच्या बापाची नाही, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे नारायण यांच्या वक्तव्याची तक्रार करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
🗣️ अधिवेशन तीन आठवड्याचे झालेच पाहिजे... :
हिवाळी अधिवेशनात दोन आठवड्यांचे कामकाज झाले आहे. विदर्भ, मराठवाड्यातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन हे संपूर्ण तीन आठवडे होणे आवश्यक असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याबाबत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
💥 वाशिमजवळ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू :
समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झाल्यानंतर या महामार्गावर अपघातांचं सत्र सुरु झाल्याचं पाहायला मिळालं आणि ते कायम असल्याचं पाहायला मिळतंय. 10 जिल्हे आणि 26 तालुक्यांतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झालाय. वाशिम जिल्ह्यातील कारंजाजवळ अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झालेत.
🏥 पंतप्रधान नरेंद्र मोदींची आई रुग्णालयात दाखल :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. रिपोर्ट्सनुसार, हिराबेन यांना रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. दरम्यान, हिराबेन यांनी 18 जून रोजीच त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला. तर, पंतप्रधान मोदींनी गुजरात निवडणुकीच्या दरम्यान गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेटही घेतली होती.
⚖️ कोचर दाम्पत्य आणि धूत यांच्या कोठडीत वाढ :
आयसीआयसीआय बँक आणि वेणूगोपाल धूत यांना दोन दिवासांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. कोचर दाम्पत्यासह, वेणूगोपाल धूत यांची सीबीआय कोठडी संपत असल्यानं आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सीबीआयकडून तिनही आरोपींची कोठडी वाढवून मागितली. परंतु, कोचर दाम्पत्य आणि धूत यांच्या वकिलांकडून सीबीआयच्या मागणीला विरोध करण्यात आला.