श्रीराम फायनान्सच्या कार्यालयात विलीनीकरणाचा जल्लोष! - latursaptrangnews

Breaking

Wednesday, December 28, 2022

श्रीराम फायनान्सच्या कार्यालयात विलीनीकरणाचा जल्लोष!




लातूर -श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड आणि श्रीराम ट्रान्सपोर्ट
फायनान्स लिमिटेड या दोन वित्तीय संस्थेचे विलनीकरण झाले असून आता
श्रीराम फायनान्स लिमिटेड असे नामकरण करण्यात आले आहे. शिवाय ही संस्था
भारतातील गैर बँकिंग क्षेत्रातील नंंंंबर वन बनली आहे. त्यामुळे  लातूर
शहरातील बार्शी रोडवरील श्रीराम फायनान्सच्या शाखेत सर्व विभागाचे
व्यवस्थापक , कर्मचारी यांनी केक कापून व फटाक्यांची  आतिषबाजी करून
जल्लोष साजरा केला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रिजनल बिजनेस हेड शिवाजी कुट्टे,
असिस्टंट जनरल मॅनेजर संतोष पाटील, रिजनल मॅनेजर नितीन पाटील आदी मान्यवर
उपस्थित होते. ग्राहकांचे प्रतिनिधी म्हणून गातेगाव विविध विकास
कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन विरसेन भोसले, सरसवतीताई भुतडा तसेच
सिनिअर मॅनेजर अजितसिंह दौडे, डिव्हिजनल मॅनेजर वैभव घाटे, श्रीराम
चिट्सचे मॅनेजर प्रविण पवार, सहायक व्यवस्थापक विजय देशमुख, अर्जुन
कांबळे, वसुली विभागाचे विभागीय मॅनेजर बद्रीलाल पुंड, सुनील जाधव,
कल्याण भिसे, बालाजी शिंदे, हनुमंत तेलंगे, अजय उगीले, लीगल मॅनेजर महेश
शिंदे, नितीन स्वामी, संतोष मोरें यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी श्रीराम फायनान्सच्या वाटचालींबद्दल व आगामी
संकल्पाबद्दल विचार मांडले. श्रीराम फायनान्स चा आतापर्यंतचा टर्न ओव्हर
1 लाख 71 हजार करोड रुपयांचा आहे  देशभरात 3600 शाखा असून 57 हजार
कर्मचारी कार्यरत आहेत. अशी माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक सीपीयू चे मॅनेजर विनायक बिडवे यांनी मांडले तर शेवटी
सिद्धेश्ववर स्वामी यांनी आपल्या मिमिक्रीतून श्रीराम फायनान्सचे महत्व
विशद करून सर्व उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment