उस्मानाबादमधील त्या लॉजवर सुरू होता भलताच प्रकार, पोलिसांनी छापा टाकला आणि सारे उघड झाले

 



उस्मानाबादमधील त्या लॉजवर सुरू होता भलताच प्रकार, पोलिसांनी छापा टाकला आणि सारे उघड झाले


उस्मानाबाद : उस्मानाबाद पोलिसांनी उस्मानाबाद शहरातील सोलापूर बायपास रोडवरील गजराज लॉजवर छापा टाकून महिलेची सुटका केली. या प्रकरणात पोलिसांनी २ व्यक्तींना अटक केली आहे.

    या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी १५ डिसेंबर रोजी गस्तीस होते. गस्तीदरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, उस्मानाबाद शहरात सोलापूर बायपास रस्त्यालगत असलेल्या ‘गजराज लॉज’ येथे लॉज चालक-व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवून घेत आहेत.

    ही माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन नमूद लॉजवर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला छापा टाकला असता लॉजच्या खोलीत एक प्रौढ महिला आढळून आली. या महिलेची महिला पोलीसांमार्फत विचारपूस केली गेल्यानंतर हॉटेल चालक एक पुरुष असून तो त्या महिलेस वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देऊन तिला लैंगिक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होता. तिच्याकडून हे काम करवून तो तिच्यावर आपली उपजीविका करीत असल्याचे समजले.
    यावर पथकाने त्या लॉज चालक पुरुषास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील एक मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण १६,५०० रुपयांचा माल हस्तगत केला. पोलिसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलेची सुटका करुन लॉज चालक पुरुषाविरुध्द भा.दं.सं. कलम- ३७०, ३७०- अ (२) यासह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- ३, ४, ५ अंतर्गत आनंदनगर पोलीस ठाण्यात दि. १६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला.

    सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार दिलीप जगदाळे, जाधव, हुसेन सय्यद, विजय घुगे, शैला टेळे, वैशाली सोनवणे, रंजना होळकर, बबन जाधवर यांच्या पथकाने केली.

    Post a Comment

    Previous Post Next Post