माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी निलंगा तालुक्यातील अनसरवाडा ग्रामपंचायत बिनविरोध काढल्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा



 माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी

निलंगा तालुक्यातील अनसरवाडा ग्रामपंचायत बिनविरोध काढल्याबद्दल
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा

 लातूर (प्रतिनिधी) १७ डीसेंबर २२ :
      निलंगा तालुक्यातील अनसरवाडा ग्रामपंचायत माजी सभापती अजित माने
यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध काढून अनसरवाडा ग्रामपंचायत शिष्टमंडळाने
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांची शनिवार
दि. १७ डिसेंबर २०२२ रोजी लातूर शहर कार्यालयात येथे भेट घेतली. यावेळी
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नूतन ग्रामपंचायत
पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
दिल्या.
      यावेळी माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, अनसरवाडा
ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच  किशोर वाघमारे, उपसरपंच संभाजी उसनाळे,
नागनाथ माने, सुरेश माने, गोविंद उसनाळे, शेषेराव गंगथडे, रामलिंग
पटसाळगे, दिगंबर कुंभार, बाळू माने, कांत डांगे, पंढरी माने, भारतबाई
माने, मंगल उसनाळे, दिगंबर उसनाळे, संजय भरगांडे, सुरेश माने, धैर्यशील
गंगथडे, गुंडू माने, दिगंबर माने नूतन ग्रामपंचायत सदस्य तालुका
काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
---

Post a Comment

Previous Post Next Post