लातूर शहर महानगर पालिकेने आयोजित केलेल्या महिलांसाठी लिंग आधारित भेदभाव आणि हिंसा कार्यशाळेस महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
लातूर शहर महानगर पालिके अंतर्गत सुरू असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान च्या माध्यमातून लातूर शहरामध्ये स्थापना करण्यात आलेल्या बचत गटाच्या महिलांसाठी लिंग आधारित हिंसा समाप्त करणे ही संकल्पना घेऊन आज दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये “नयी चेतना: पहल बदल की” नावाची लिंग आधारित भेदभाव दूर करण्यासाठी हिंसा समाप्त करण्याच्या अनुषंगाने आयोजित जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयुक्त श्री.बाबासाहेब मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त श्री शिवाजी गवळी यांच्या नियोजनांनुसार या जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपायुक्त मयूरा शिंदेकर व उपायुक्त विना पवार यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या अड. श्रीमती सुजाता माने व श्रीमती संगीता डवरी, जिल्हा समूह संघटक जिल्हा परिषद लातूर यांनी महिलांना सामाजिक क्षेत्रामध्ये व वैयक्तिक जीवनामध्ये काम करीत असताना पावलो पावली मानहाणीच्या समस्या येत असतात ते गुमान सहन न करता त्यास वेळीच आवर घातला तर अशा होणार्या घटनांना आळा बसतो व पुढील पिढीला त्याचा त्रास सहन करावा लागणार नाही यासाठी शासन स्तरावर दामिनि पथक आहे तर सर्व विभागामध्ये महिला अत्याचार विरोधी पथक व समित्या स्थापन केलेल्या असून त्याचे हेल्प लाइन नंबर पण उपलब्ध करून देण्यात आले आहेत अशा यंत्रणेकडे वेळीच तक्रार नोंद करावी जेणेकरून अशा घटना होणार नाही व ही जाणीव जागृती आपल्या स्वतः पासून सुरू करणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन केले.
उपायुक्त विना पवार यांनी महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे वेळोवेळी लक्ष दिले तर महिलांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल यासाठी महिलांनी वेळोवेळी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावे, नियमित आहार करणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अभियान व्यवस्थापक लक्ष्मण जाधव व अभियान व्यववस्थापक चंद्रकांत तोडकर यांनी आभार मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समुदाय संघटक विरेंद्र सातपुते व सर्व समूह संसाधन व्यक्तिने प्रयत्न केले.