जिल्हा परिषदेच्या या शाळेत विद्यार्थी येईना... असे काय घडले त्या शाळेत..
परभणी : परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील धारासुर जिल्हा परिषदे शाळेमध्ये एका शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेमध्ये येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोवळ्या वयामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पसरलेली भीती दूर करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर उभे राहिले आहे.
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील धारासुर तांडा येथील जिल्हा परिषदेत शाळेमध्ये कार्यरत असणारे शिक्षक विठ्ठल रत्नपारखे यांनी सहशिक्षक रावसाहेब राठोड यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. ही घटना घडल्यानंतर रत्नपारखे यांच्या कुटुंबीयांनी सोनपेठ पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीवरून रावसाहेब राठोड यांच्यावर आत्महत्या प्रर्वत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सहशिक्षक रावसाहेब राठोड यांना ताब्यात घेतले आहे.
मुलांना बिस्कीटासाठी १०० रुपये दिले अन्...
गंगाखेड शहरात राहणारे शिक्षक विठ्ठल रत्नपारखे यांनी सोमवारी सकाळी शाळेत आत्महत्या केली होती. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेले. नेहमीप्रमाणे त्यांनी शाळा उघडल्यामुळे विद्यार्थी शाळेमध्ये आले. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किट खाण्यासाठी शंभर रुपये दिले. त्यामुळे काही विद्यार्थी बिस्किट आणण्यासाठी दुकानावर गेले. त्यानंतर शिक्षक विठ्ठल रत्नपारखे हे वर्ग खोलीमध्ये गेले आणि त्यांनी आत मधून दार लावून घेऊन वर्गखोलीमध्ये दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. बिस्किट घेऊन आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी खिडकीमधून आत पाहिला असता शिक्षक विठ्ठल रत्नपारखे यांनी आत्महत्या केली असल्याचे विद्यार्थ्यांना दिसून आले.
Tags
महाराष्ट्र