ओमिक्रॉनच्या सर्वात धोकादायक व्हेरियंटची भारतात एन्ट्री - latursaptrangnews

Breaking

Saturday, December 31, 2022

ओमिक्रॉनच्या सर्वात धोकादायक व्हेरियंटची भारतात एन्ट्री

 

ओमिक्रॉनच्या सर्वात धोकादायक व्हेरियंटची भारतात एन्ट्री





गुजरातः नवीन वर्षाच्या जल्लोषाची तयारी सुरू असतानाच देशात करोनाचे सावट आहे. चीनसह जगभरात करोनाचा हाहाकार सुरू असतानाच आता भारताची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ओमिक्रॉनचा उपप्रकार असलेला व्हेरियंट XBB1.5चा रुग्ण भारतात सापडला आहे. भारतीय सार्स कोव-२ जीनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) च्या अहवालानुसार डिसेंबरमध्येच हा व्हेरियंट भारतात सापडला आहे. गुजरातमध्ये याचा पहिला रुग्ण सापडला आहे.

काही दिवसांपूर्वी भारतात bf.7 व्हेरियंटचे रुग्ण आढळले होते. त्यातच आता XBB1.5 रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. याच व्हेरियंटमुळं न्यूयॉर्कमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. XBB व्हेरियंट बीए.२.१०.१ आणि बीए.२.७५ चं म्युटेशन आहे. हा व्हेरियंटचा भारतासह जगभरातील ३४ अन्य देशात फैलाव झाला आहे. ओमिक्रॉनच्या जातकुळीतील हा सर्वात धोकादायक व्हेरियंट असल्याचे तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

सध्या या व्हेरियंटच्या जेनेरिम फुटप्रिंटवर तज्ज्ञ काम करत आहेत. राज्यात १०० टक्के जिनोमिक सीक्वेंसिग होत आहे. तर, परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग, रॅपिट टेस्टिंग होत आहे. यातील पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जिनोमिक सीक्वेसिंगसाठी पाठवत आहोत, असं डॉ. प्रदीप आवटे यांनी म्हटलं आहे. सध्या महाराष्ट्रात २७५ हून अधिक XBB व्हेरियंटचे रुग्ण आहेत. मात्र, XBB.1.5 हा वेगळ्या प्रकाराचा व्हेरियंट आहे. याच्या ट्रान्समिसिबिलीटीबाबत खूप कमी माहिती उपलब्ध आहे.

करोनाचे नवीन व्हेरियंट BF.7 चीन, अमेरिका, ब्रिटन, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्कसह जगभरातील इतर अनेक देशांमध्ये आढळले आहे, परंतु चीनमध्ये या व्हेरियंटचा फैलाव अधिक आहे. इतर देशांमध्ये मात्र तितकासा धोका जाणवत नाही. भारतातही त्याची प्रकरणे क्वचितच पाहायला मिळतात. तर ओमिक्रॉन व्हेरियंटचे सब-वेरियंट XBB ची प्रकरणे समोर येत आहेत.

No comments:

Post a Comment