नववर्षाला साई मंदिर रात्रभर खुले, शिर्डी संस्थानाचा भक्तांसाठी दिलासादायक निर्णय
शिर्डी : सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाचे स्वागत करताना साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत लाखो भाविक येत असतात. आजपासूनच शिर्डीत मोठी गर्दी होत असून साईबाबा संस्थानकडून भक्तांच्या निवासासह भोजन आणि दर्शनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच संभाव्य गर्दी पाहता दरवर्षीप्रमाणे यंदाही साईबाबा समाधी मंदिर त्यांना दर्शनासाठी रात्रभर खुलं असणार आहे.
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी साईनगरी सज्ज झाली असून साईमंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. लाखो साईभक्त शिर्डीत येणार असल्याने त्यांच्या निवासासाठी भक्तनिवास आणि शिर्डीतील हॉटेलही सज्ज झाले आहेत. येणाऱ्या भक्तांची दर्शनाची, निवासाची, प्रसादाची तसेच सुरक्षा संदर्भातील सर्व व्यवस्था साईबाबा संस्थानकडून करण्यात आल्याची माहिती साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली आहे.
देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेले शिर्डीच्या साई मंदिरास यंदा १ जानेवारी ते २६ डिसेंबर संस्थानला सर्व प्रकारे एकूण ३९४ कोटी २८ लाख ३६ हजार देणगी मिळाली आहे. ३१ डिसेंबरपर्यंतच्या देणगीसह हा आकडा ४०० कोटींचा विक्रमी टप्पा पार करण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत. साई संस्थानच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे.
प्रत्येक वर्षी साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या देणगीमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. साई संस्थानचे आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असे असते. परंतु, जानेवारी ते डिसेंबर या कॅलेंडर वर्षात साई संस्थानला किती दान आले, याची उत्सुकता अनेकांना असते. यंदाही दान भरभरून मिळालं असून जवळपास ४०० कोटींचे दान साईभक्तांनी साईचरणी अर्पण केलं आहे.
२६ डिसेंबरपर्यंत दक्षिणा पेटीत १६५ कोटी ५५ लाख, देणगी काउंटरवर ७२ कोटी २६ लाख, डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे ४० कोटी ७४ लाख, ऑनलाइन देणगीतून ८१ कोटी ७९ चेक व डीडीद्वारे १८ कोटी ६५ लाख, तसेच मनीऑर्डर मधून १ कोटी ८८ लाख रुपये जमा झाले आहेत. विदेशी चलन खात्याचा परवाना नूतनीकरण प्रलंबित असल्याने कोट्यावधींचे विदेशी चलन पडून आहे. दरवर्षी या माध्यमातून जवळजवळ १५ ते २० कोटी रुपयांची देणगी मिळत असते.

Tags
ताज्या बातम्या