या' मराठी माणसामुळे रविवारची सुट्टी मिळते!
या' मराठी माणसामुळे रविवारची सुट्टी मिळते!
💁♂️ सर्व लोक आठवडाभर रविवार या एका दिवसाची वाट पाहात असतात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का, की भारतात रविवारच्या सुट्टीची सुरुवात कधी झाली? ही सुरुवात कोणी केली? याचा इतिहास नेमका काय? चला तर याबाबत जाणून घेऊयात!
▪️रविवारच्या सुट्टी या घटनेचा इतिहास अत्यंत दुःखद आहे. यामागे खूप मोठा संघर्ष अन् लढाई आहे.
▪️रविवारच्या सुट्टीचं श्रेय जातं नारायण मेघाजी लोखंडे यांना. आपल्याला सर्वांना माहितच आहेच, की भारतावर ब्रिटीशांचं राज्य होतं. यावेळी लोकांवर अत्याचार केले जात. त्या काळात कामगारांना आठवड्यातील सातही दिवस विना सुट्टी काम करावं लागत.
▪️त्यावेळी नारायण मेघाजी लोखंडे कामगारांचे नेते होते. त्यांनी कामगारांची अवस्था पाहून याबाबत ब्रिटीशांजवळ आपली बाजू मांडत आठवड्यात एक दिवस सुट्टी देण्याची परवानगीही मागितली.
▪️ मात्र, ब्रिटीश सरकारने ही मागणी फेटाळून लावली. मग लोखंडे यांनी कामगारांसोबत मिळून या गोष्टीचा विरोध केला.
▪️विरोध केला हे बोलणे वाटतंय तितकं सोपं नव्हतं. कारण तो संघर्षच वेगळा होता. अखेर त्यांच्या मेहनतीला यश आलं आणि जवळपास सात वर्षांनंतर इंग्रज सरकारनं 10 जून 1890 मध्ये आदेश जारी केला. यानंतर आठवड्यातील एक दिवस म्हणजेच रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच दररोज दुपारी अर्धा तास विश्रांतीसाठी देण्यात आला.
💫एकंदरीत विचार केला तर लक्षात येईल. आपल्याला मिळालेली रविवारची सुट्टी इतकी सहज मिळाली नाही. त्यामागे अनेक लोकांच्या संघर्षाचा तो परिपाक आहे. त्याला त्या सर्वांना विसरून चालणार नाही.
No comments