दिवसभरातील ताज्या घडामोडी
⚡ पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण पार पडलं आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतुकीचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र या क्षणाची वाट पाहत होता. कमी वेळेत नागपूर ते मुंबईचा प्रवास घडवणारा हा महामार्ग खऱ्या अर्थाने प्रवाशांना समृद्ध करणारा आहे.
👍 जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाचं वर्चस्व :
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगर येथील मतदारसंघातून भाजपचे उमदेवार मंगेश चव्हाण हे 76 मतांनी विजयी झाले आहे. तर एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदा खडसे यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. यानंतर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, आम्हाला परभव मान्य आहे, पण विरोधकांनी खोक्याची ताकद लावून निवडणूक जिंकली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
💁♂️ चंद्रकांत पाटील यांच्या विनंतीनंतरही 11 पोलिसांचं निलंबन :
उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी 11 पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये आठ पोलीस कर्माचरी तर तीन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी शाईफेक केली होती.
👀 जीमेल झाले ठप्प! जगभरातील लाखो युजर्सना फटका :
शनिवारी 10 डिसेंबरला जगभरातील लाखो वापरकर्त्यांचे जीमेल अकाउंट अचानक ठप्प झाले होते. जवळपास तासभर जीमेल सुविधा ठप्प होत्या. यानंतर एका तासात गूगल वर्कस्पेस डॅशबोर्डवर बिघाड झाल्याने सेवा बंद असल्याचे गूगलने मान्य केले. जीमेल काम करणे बंद झाल्यावर अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून तक्रार नोंदवली होती ज्यावर उत्तर देताना गूगलने आपली चूक मान्य करून सुधारल्याचे सांगितले होते.
🎬 दृश्यम 2' 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील :
वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत आता बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या
'दृश्यम 2' या सिनेमाचा समावेश आहे. हा रहस्यमय सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 'दृश्यम 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. रिलीजच्या 23 दिवसांत हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
No comments