Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    सरपंचपदाची निवडणूक लढवण्यासाठी बाळंतीण नवजात बालकासह आली

     


    सरपंचपदाची निवडणूक लढवण्यासाठी बाळंतीण नवजात बालकासह आली


    बीड : जिल्ह्यात सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे फॉर्म भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. ग्रामपंचायत निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अनेक घटना नेहमीच पाहायला मिळतात. मात्र यावेळेस घडली एक अनोखी घटना घडली. काही दिवसांपूर्वीच प्रसूती झालेल्या उमेदवार महिलेने चक्क रुग्णवाहिकेतून येऊन उमेदवारी अर्ज भरला आहे. आपल्याला घेऊन ही महिला अर्ज भरण्यासाठी दाखल झाल्याने या घटनेने सगळ्याच उमेदवारांचं लक्ष वेधलं. ही घटना आहे वानटाकळीमधील.

    बीडच्या परळीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एका महिला उमेदवाराने सर्वांचचं लक्ष वेधून घेतलं. काही दिवसांपूर्वीच प्रसूती झालेली एक महिला उमेदवार रुग्णवाहिकेतून आली आणि तिने सरपंच पदासाठी अर्ज भरला. पल्लवी निवृत्ती माने (रा. वानटाकळी) असं या उमेदवार महिलेचे नाव आहे.


    ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. या अनुषंगाने वानटाकळी येथील सरपंचपदाच्या इच्छुक उमेदवार पल्लवी निवृत्ती माने या चक्क रुग्णवाहिकेतून आल्या. आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात त्यात बाळासह दाखल झाल्या. काही दिवसांपूर्वीच पल्लवी यांची प्रसूती झाली आहे. त्या स्वतः आपल्या परिवार आणि कार्यकर्त्यांसह उमेदवारी दाखल करण्यासाठी आल्या होत्या. विशेष म्हणजे यावेळी त्यांचे नवजात बाळही सोबत होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत ही घटना परळीत लक्षवेधी ठरली.

    उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या पल्लवी माने यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्त्रीने एखादी गोष्ट करण्याचा जर निश्चयच केला तर कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही वेळेला ती आपलं ध्येय गाठू शकते. हेच या घटनेतून समोर आलं आहे. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरला आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad