Palghar Gang Rape : महाराष्ट्र हादरला! 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 11 जणांनी केला बलात्कार

 


Palghar Gang Rape : महाराष्ट्र हादरला! 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 11 जणांनी केला बलात्कार

पालघरमध्ये धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पालघरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर 11 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या 11 नराधमांपैकी 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर 6 आरोपींचा शोध सातपाटी सागरी पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यातील बहुतांश आरोपी हे नशेच्या आहारी गेल्याचे माहिती देखील समोर आली आहे.

पालघर जिल्ह्यातील माहीम येथील पानेरीजवळ एका निर्जन ठिकाणी माहीम येथे राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीवर 11 तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणांपैकी अनेक तरुण हे गर्दच्या (नशेचा पदार्थ) आहारी गेल्याची माहितीही आहे. पीडित अल्पवयीन मुलीने माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post