लातूर आयएमएच्या वतीने ५ फेब्रुवारी रोजी लातुरात हाफ मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन
लातूर आयएमएच्या वतीने ५ फेब्रुवारी रोजी
लातुरात हाफ मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन
लातूर : लातूर आयएमएच्या वतीने येत्या दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी लातुरात विश्व सुपर मार्केट आयएमए हाफ मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा तीन टप्प्यात घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांना १५ जानेवारी २०२३ पर्यंत आपली नावे नोंदवता येतील.
लातूर आयएमएच्या वतीने मागील पाच वर्षांपासून लातुरात ३ किमी, ५ किमी., व १० किमी अंतराची मॅराथॉन स्पर्धा घेण्यात येत होती. यावर्षी या स्पर्धेत आता २१ किमी. या हाफ मॅराथॉन चा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही हाफ मॅराथॉन स्पर्धा ३ किमी., १० किमी. व २१ किमी. अशा तीन टप्प्यात संपन्न होणार आहे. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी तरुण - तरुणी, वृद्ध अशा सर्वच वयोगटातील स्पर्धकांनी या मॅराथॉन स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे स्पर्धक आपल्या नावाची नोंदणी दि. १५ जानेवारी २०२३ पर्यंत करू शकतात. ही स्पर्धा दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी बार्शी रोडवरील लातूर ऑफिसर्स क्लबपासून सुरु होईल. या स्पर्धेचे प्रायोजकत्व भारती आणि गित्ते ग्रुप, लातूर ऑफिसर्स क्लब, सनरीच ऍक्वा ,कीर्ती गोल्ड, प्रा. मोटेगावकर यांचे आरसीसी क्लासेस हे आहेत.
या मॅराथॉन स्पर्धेच्या पोष्टरचे अनावरण नुकतेच लातूरचे सुपुत्र तथा सिने अभिनेते - दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख यांच्या हस्ते बाभळगाव येथे करण्यात आले. याप्रसंगी आयएमएचे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, डॉ. अजय जाधव, डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ. चांद पटेल आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मॅराथॉन स्पर्धेच्या पोश्टर अनावरणप्रसंगी बोलताना रितेश देशमुख यांनी आयएमएच्या या उपक्रमाचे कौतुक करून मॅराथॉन स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. या हाफ मॅराथॉन स्पर्धेत लातूर शहर, परिसर व जिल्हाभरातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन आयएमएचे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, सचिव डॉ. मुकुंद भिसे, डॉ अजय जाधव, डॉ. चांद पटेल, डॉ. ब्रिजमोहन झंवर, आरती झंवर, डॉ. सुधीर फत्तेपूरकर, डॉ. विमल डोळे, डॉ. सौ वैशाली टेकाळे यांसह आयएमएच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment