दिवसभरातील ताज्या घडामोडी



दिवसभरातील ताज्या घडामोडी 


🔥 झटका! एलपीजी गॅस सिलेंडर दरात वाढ :


नव्या वर्षाची सुरुवात महागाईच्या चटक्याने झाली आहे. इंधन कंपन्यांनी आज एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाहीर केले आहेत. प्रति सिलेंडरमागे 25 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडरसाठी लागू करण्यात आली आहे. तर, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्यादरात कोणताही बदल झाला आहे. 


💰 तळीरामांनी सरकारची तिजोरी भरली :


आता, कोरोनानंतर आर्थिक गाडा पूर्वपदावर आल्याने चालू आर्थिक वर्षामध्ये मद्याच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झाली आहे. मद्य विक्रीतून सरकारच्या तिजोरीत भर पडली आहे. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात मद्य विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षातील 9 महिन्यात 14 हजार 480 कोटींचा महसूल मिळाला आहे. 


👨‍⚕️ राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर :


राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर जाणार आहेत. शनिवारपर्यंत वेळ देऊन देखील चर्चेचे निमंत्रण न मिळाल्याने उद्यापासून संपावर जाण्याच्या निर्णयावर 'मार्ड' ठाम आहे. त्यामुळे राज्यभरातील पाच हजारांहून अधिक डॉक्टर संपावर जाणार आहे. यामुळे नवीन वर्षाच्या सुरवातीलाच आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. दरम्यान मार्डने काही दिवसांपूर्वीच आपल्या मागण्या प्रशासन, सरकारसमोर मांडत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. 


😎 अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढणार :


राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी नववर्षांतही कायम आहेत. गतवर्षी त्यांच्यावर टीईटी, गायरान जमीन प्रकरण व कृषी महोत्सवाच्या नावाने पैसे गोळा केल्याचा आरोप झाला. त्यानंतर आता सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी त्यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप केला आहे. यामुळे सत्तार यांच्या अडचणींत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.


🗣️ सत्तारांच्या गौप्यस्फोटावर केसरकरांची प्रतिक्रिया :


माझ्या पक्षातील काही नेत्यांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचल्याचा गौप्यस्फोट कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलाय. त्यामुळे शिंदे गटामध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू झाली असल्याची चर्चा आहे. त्यावर आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. अनेकवेळी ते गंमतीने बोलतात. त्यांना किती गंभीरपणे घ्यायचे मला माहिती नाही, असे केसरकर म्हणाले.


Post a Comment

Previous Post Next Post