फिरोज हसन शेख यांना पत्रकार क्षेत्रात सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित
औरंगाबाद , ( प्रतिनिधी :)
माणुसकी रुग्णसेवा समूह घाटी, यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सु लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष सुमित पंडित यांनी आयोजित सेवा गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.औरंगाबाद येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे हा पुरस्कार सोहळा थाटामाटात पार पडला. या पुरस्काराचे उद्घाटन माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या हस्ते करण्यात आले असून प्रमुख पाहुणे म्हणून भगवान महाराज जंजाळ होते प्रमुख उपस्थिती सिद्धार्थ सोनवणे, ज्युनिअर चार्ली चपीयन व अनेक मान्यवर उपस्थित होते.
फिरोज हसन शेख यांना हा सेवा गौरव पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र होते. त्यांनी पत्रकार क्षेत्रात आपल्या लेखणीतून सामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढे आले समाजामध्ये यांनी मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम हाती घेतले आहे यांच्यामार्फत रक्तदान शिबिरे व विविध उपक्रम हे नेहमीच घेत असतात यांचे सर्व स्तरावरून पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.