Urfi Javed: "तुमच्या कामांकडे लक्ष द्या",चित्रा वाघ यांच्या पोस्टला उर्फीचा कडक रिप्लाय

 


Urfi Javed: "तुमच्या कामांकडे लक्ष द्या",चित्रा वाघ यांच्या पोस्टला उर्फीचा कडक रिप्लाय


उर्फी जावेद आणि तिची फॅशन हे समीकरण सर्वांनाचं माहीत आहे. ती कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ट्रोलच्या निशाण्यावर येते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे. यामूळं तिला अनेक लोकांनी तिच्यावर टिका केली आहे. मात्र उर्फीनेही सर्वांना जोरदार प्रत्यूत्तर दिलयं.

नुकतचं भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचा एक व्हिडीओ शेअर करत ट्वीट करत म्हणाले की, "श्शीSSS...अरे हे काय चाललंय मुंबईत? रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला, मुली विकृतांच्या शिकार होतायत तर ही बया अजून विकृती पसरवतीये."

त्यानंतर उर्फीने तिची नवीन स्टाईल दाखवली. इतकच नाही तर तिने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या ट्वीटला उत्तर दिला. उर्फी ट्वीट करत म्हणाली की, 'आज राजकारण्यांना पाहून वाईट वाटते. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला लक्ष्य करत आहे. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष देणं, सोयीचं आहे. नेहमीच पीडितेच्या कपड्यांना दोष दिला जातो अनेक मूद्दे आहेत. जसं बेरोजगारी, लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणं, खून. या प्रकरणांचे काय?'

Post a Comment

Previous Post Next Post