Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    हिंगोलीः ३० जणांना घेऊन जाणारी बस उलटली; प्रवासी साखर झोपेत असताना अपघात

     


    हिंगोलीः ३० जणांना घेऊन जाणारी बस उलटली; प्रवासी साखर झोपेत असताना अपघात


    हिंगोलीः औंढा नागनाथ ते हट्टा मार्गावर बोरीसावंत शिवारात एसटी महामंडळाची बस उलटून झालेल्या अपघातात २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत. मंगळवारी ता. १० पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. हट्टा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबाजोगाई आगाराची चंद्रपूर-अंबाजोगाई(क्र.एमएच-०९-एफएल-१०२०) हि बस आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास औंढा नागनाथ ते हट्टा मार्गावर बोरीसावंत शिवारात आली असतांना समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने बसला कट मारला. यामध्ये ट्रकची बसला धडक बसू नये यासाठी चालकाने प्रवाशांना वाचविण्यासाठी बस बाजूला घेण्याच्या प्रयत्न केला. मात्र यामध्ये चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. या अपघातानंतर प्रवाशांमधून एकच गोंधळ उडाला.


    दरम्यान, या प्रकाराची माहिती एका कारचालकाने रिपाईचे पदाधिकारी किरण घोंगडे यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने या बाबतची माहिती गावकरी व हट्टा पोलिसांना दिल्यानंतर हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार शेषराव लाखाडे, सय्यद खतीब, राजेश ठाकूर, आंबादास बेले यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने जखमी प्रवाशांना बस बाहेर काढले.

    यामध्ये सुमारे २५ ते ३० प्रवाशी जखमी झाले आहेत. यामध्ये बहुतांश प्रवाशांना किरकोळ दुखापत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रवाशांना तातडीने उपचारासाठी वाहनाने हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad