Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    मुस्लीम बांधवानं १८ एकर पिकावर फिरवला नांगर

     


    मुस्लीम बांधवानं १८ एकर पिकावर फिरवला नांगर

    परभणी : परभणी शहरातील पाथरी रोडवर होत असलेल्या शिवपुराण कथेसाठी मुस्लीम बांधवांनी १५ एकरावरील तूर आणि साडेतीन एकर हरभरा पिकावर नांगर फिरवला आहे त्यामुळे परभणी मध्ये पुन्हा एकदा सर्वधर्मसमभाव या एकोप्याचे दर्शन झाले आहे. या कथेच्या आयोजन परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे. ही कथा पंडित प्रवीण महाराज मिश्रा यांच्या वाणीतून संपन्न होणार आहे, अशी माहिती परभणीचे खासदार संजय जाधव यांनी दिली आहे.

    परभणी शहरातील पाथरी रोडवर चाळीस एकर जागेमध्ये १३ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान चाळीस एकर जागेवर शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती परभणीचे खासदार संजय जाधव यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन दिली होती. एवढा मोठा कार्यक्रम घ्यायचा कुठे असा प्रश्न त्यांना पडला होता. परभणीतील प्लॉटिंग व्यावसायिक हाजी शोएब यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आपली चाळीस एकर जागा विनामूल्य वापरण्यासाठी दिली आहे. हाजी साहेब यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या जागेवर असलेली १५ एकर तूर आणि साडेतीन एकर हरभऱ्यावर नांगर फिरवला आहे
    मुस्लीम असलेल्या हाजी शोएब यांनी हिंदूंच्या कार्यक्रमासाठी लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडले आहे. त्यांनी दिलेल्या चाळीस एकर जागेवर हिंदू शिवपुराण कथेसाठी मोठ्या प्रमाणात जयत तयारी सुरू करण्यात आली आहे. याच ठिकाणी १३ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान प्रदीप जी मिश्रा यांच्या वाणीतून शिवपुराण कथा पार पडणार आहे. ते मध्य प्रदेश मधील सिहोरे येथील रहिवासी आहेत या कार्यक्रमासाठी परभणी व राज्यभरासह इतर राज्यातील पाच लाखापेक्षा अधिक भाविक उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजक संजय जाधव यांनी दिली आहे. दरम्यान, शिवपुराण कथेसाठी मुस्लीम बांधवांनी ४० एकर जमीन उपलब्ध करून दिली असल्याने हिंदू मुस्लीम एकोप्याचं दर्शन झाले आहे .

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad