परभणीत मध्यरात्री थरार! दुकानदाराचे हात-पाय बांधून शेतात नेलं... - latursaptrangnews

Breaking

Tuesday, January 24, 2023

परभणीत मध्यरात्री थरार! दुकानदाराचे हात-पाय बांधून शेतात नेलं...

 


परभणीत मध्यरात्री थरार! दुकानदाराचे हात-पाय बांधून शेतात नेलं....


परभणी: मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे दार वाजवून आत प्रवेश केला. नंतर युवकाचे हात पाय बांधला युवकाला शेतामध्ये घेऊन जाऊन विष पाजल्याची धक्कादायक घटना परभणीच्या सेलू तालुक्यातील खेर्डा येथे घडली आहे. गणेश रंगनाथ भुजबळ असे विष पाजलेल्या युवकाचे नाव आहे. सदरील युवकाजवळ मोबाईल असल्याने युवकाचे प्राण वाचले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेची प्राथमिक चौकशी केली आहे.
परभणीच्या सेलू तालुक्यातील खेर्डा येथे गणेश रंगनाथ भुजबळ यांचे घराच्या बाजूला किराणा दुकान आहे. १२ जानेवारी रोजी चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा वाजवल्याने किरणने दरवाजा उघडला. त्यानंतर चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश करून गल्ल्यातील पन्नास हजार रुपये रोख रक्कम घेतली. त्यानंतर चोरट्यांनी गणेशाचे तोंड बांधून शेतामध्ये घेऊन गेले व गणेशला विष पाजले त्यानंतर चोरट्यांनी शेतामधून पळ काढला.

गणेश जवळ मोबाईल असल्याने घडलेला सर्व प्रकार त्याने मित्राला कसाबसा सांगितला. त्यानंतर गणेश याला तातडीने उपचारासाठी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार केल्यानंतर गणेशला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर प्रकृती ठीक झाल्याने गणेशला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. याप्रकरणी अद्याप पर्यंत सेलु पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर घटनेची माहिती मिळतात सेलू पोलिसांनी प्राथमिक माहिती घेतली असल्याचे वृत्त आहे

No comments:

Post a Comment