लातूर शहरात दि.18/02/2023 पासुन सुरु होना-या श्री.सिध्देशश्वर व रत्नेेश्वर देवालयाच्या यात्रा महोत्सव कालावधीत लातूर शहरातील वाहतुक मार्गात बदल
लातूर शहरात दि.18/02/2023 पासून श्री.सिध्देश्वर व रत्नेश्वर देवालयाच्या 70 व्या महाशिवरात्री निमीत्त यात्रा महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याने यात्रेला येणा-या वाहनामुळे सदर परिसरात वाहतुक कोडी निर्माण होऊ नये म्हणुन मंदीर परिसरातील खालील ठिकाणाहून मंदीराकडे येणा-या मार्गावरील वाहतुक प्रतिबंधीत करणे आवश्यक असल्याने यात्रा कालावधीमध्ये खालील मार्गावरील वाहतुक प्रतिबंधीत करण्यात येत आहे.
अ) दि.18.02.2023 पासून यात्रा कालावधीपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणारे मार्ग
1. रिंग रोडमार्गे मळवटी चौकाकडुन मंदीर परिसरात यात्रेकडे येणा-या सर्व वाहनांना (दुचाकी वगळून एस.टी.बसेस, ट्रक, टॅक्सी,टेम्पो, ट्रॅव्हल्स व मिनीडोर,कार ,मोटारसायकल इ.) मळवटी चौकापासून पुढे वाहतुकीस बंदी असेल.
2. गांधी चौक, हत्ते कॉर्नर, सिध्देश्वर चौक मार्गे मंदीर परिसरात यात्रेकडे येणारी सर्व वाहनांना(दुचाकी वगळून) सिध्देश्वर चौकापासून पुढे वाहतुकीस बंदी असेल.
3. शाहु चौकाकडुन 60 फुटी रोड, अब्दुल कलाम चौक मार्गे मंदीर परिसरात यात्रेकडे येणारे सर्व वाहनांना (दुचाकी वगळून) अब्दुल कलाम चौकापासून पुढे वाहतुकीस बंदी असेल.
4. बरकत नगरकडुन मंदीर परिसरात यात्रेकडे येणारे सर्व वाहनांना (दुचाकी वगळून) बरकत नगर कॉर्नरपासुन पुढे वाहतुकीस बंदी असेल.
तरी सर्व नागरीकांनी दि.18.02.2023 पासून यात्रा कालावधीपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करुन वाहतुकीसाठी बंद असलेल्या मार्गावर वाहनांचा वापर टाळून प्रशासनास सहकार्य करावे.