शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टाचे तीन प्रश्न; शिंदे गटाच्या वकिलांचं टेन्शनच वाढलं!
नवी दिल्ली : शिवसेना (Shiv Sena) कुणाची? या प्रश्नाभोवती गेल्या 8 महिन्यांपासून राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. आज तिसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) सुनावणी होतं आहे.
आज शिंदे गटाकडून (Shinde Group) युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यानंतर शिवसेनेकडून मोठा दावा करण्यात आला. त्यानंतर आमदारांना नोटीस मिळताच अविश्वास प्रस्ताव कसा आला, अशी विचारणा कोर्टानं केली.
दरम्यान, शिंदे गटाच्या वकिलांनी राज्यातील सत्तासंघर्षाचा घटनाक्रम मांडतानाच शिंदे गटाची भक्कमपणे बाजू मांडली. यावेळी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (Chief Justice DY Chandrachud) यांनी दोन महत्त्वाचे प्रश्न शिंदे गटाच्या वकिलांना विचारले. या अत्यंत कळीच्या मुद्द्याने या प्रकरणाचा रोखच बदलला जाण्याची शक्यता आहे.
तसंच विधानसभा उपाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरही कोर्टानं टिप्पणी केलीये. शिंदे गटाच्या दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी शिंदे गटाच्या वकिलांना दोन महत्त्वाचे प्रश्न विचारले. अपात्रतेची नोटीस मिळताच अविश्वास प्रस्ताव कसा आला? तसंच नोटीस दिल्यावर तुम्हाला अपात्रच करण्यात आलं असतं असं तुम्हाला का वाटतं? विधानसभा उपाध्यक्ष इतरही कारवाई करू शकले असते, असा सवाल चंद्रचूड यांनी विचारला. त्यामुळं शिंदे गटाची चांगलीच कोंडी झालीये