नाशिक, दि. 3 फेब्रुवारी, 2023(विमाका वृत्तसेवा) – नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी पहिल्या पसंतीची सर्वाधिक 68 हजार 999 मत मिळवून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी श्री. तांबे यांना प्रमाणपत्र देवून विजयी उमेदवार म्हणून घोषित केले.
विभागीय आयुक्त श्री गमे यांनी पहिल्या पसंतीच्या 1 लाख 29 हजार 615 मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्याची घोषणा करत उमेदवारांना प्राप्त मतांची माहिती दिली. विजयी उमेदवारासाठी 58 हजार 310 मतांचा कोटा ठरविण्यात आला होता. सत्यजित तांबे यांनी निश्चित कोट्यापेक्षा 10 हजार 689 मते अधिक प्राप्त केली.त्यांना 68 हजार 999 मत प्राप्त झाली आहेत. एकूण मतमोजणी नतंर 1 लाख 16 हजार 618 मत वैध ठरली तर 12 हजार 997 मत अवैध ठरल्याचे त्यांनी सांगितले.
मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाच्या परवानगीने श्री गमे यांनी सत्यजित तांबे यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले.
यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक, जिल्हाधिकारी नाशिक तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गंगाथरण् डी., जिल्हाधिकारी अहमदनगर तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी धुळे तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा, जिल्हाधिकारी जळगाव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमन मित्तल, जिल्हाधिकारी नंदूरबार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे, उपायुक्त उन्मेष महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.
वैध ठरलेल्या मतांपैकी एकूण 15 उमेदवारांना प्राप्त पहिल्या पसंतीचे मते पुढील प्रमाणे.
=========================
शुभांगी भास्कर पाटील: 39534
रतन कचरु बनसोडे :2645
सुरेश भिमराव पवार :920
अनिल शांताराम तेजा :96
अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर :246
अविनाश महादू माळी :1845
इरफान मो इसहाक :75
ईश्वर उखा पाटील :222
बाळासाहेब रामनाथ घोरपडे :710
ॲड. जुबेर नासिर शेख :366
ॲड.सुभाष राजाराम जंगले :271
नितीन नारायण सरोदे :267
पोपट सिताराम बनकर :84
सुभाष निवृत्ती चिंधे :151
संजय एकनाथ माळी :187
from महासंवाद https://ift.tt/WzRb8iJ
via IFTTT https://ift.tt/CLxa4j7