खासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

नवी दिल्ली, 03 : राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली.

परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक, अमरज्योत कौर अरोरा यांनी डॉ बोंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे करण्यात येणारे कार्य, प्रका‍शित करण्यात येणारी प्रकाशने, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, कार्यालयाच्या सोशल मिडीयाहून देण्यात येणारी माहिती, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांशी साधण्यात येणारा समन्वयाबाबत माहिती दिली. तसेच, परिचय केंद्राच्यातवीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली. डॉ बोंडे यांना यावेळी “लोकराज्य” मासिकाची प्रत भेट करण्यात आली. त्‍यांनी परिचय केंद्राच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.



from महासंवाद https://ift.tt/BINe4xp
via IFTTT https://ift.tt/vDyKMjO

Post a Comment

Previous Post Next Post