अखेर 'त्या' वादग्रस्त आमदाराविरूद्ध लातुरात गुन्हा दाखल
लातुर:-दोन धर्मात, दोन समाजात तेढ निर्माण होईल असे प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी तेलंगणातील भाजपा आ. टी. राजासिंग उर्फ राजूसिंग याच्याविरूद्ध लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर येथे १९ फेब्रुवारी रोजी सर्व लातूरकरांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी केली. याच दिवशी शहरातून भव्य मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली. मोटार सायकल रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर येथे करण्यात आला. या रॅलीनंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या चबुतऱ्याशेजारी उभे राहून आ. टी. राजासिंग लोध उर्फ राजासिंग उर्फ राजूसिंग यांनी भाषण केले. ते भाषण प्रक्षोभक, जातीय तेढ निर्माण करणारे होते. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकाकडे विविध पक्ष संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. आ. राजसिंग हे हर मुसलमान मे अफजलखान देखो' व याहीपेक्षा प्रक्षोभक स्वरूपात भाषण केले म्हणून त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा विविध संघटना, पक्षांनी दिला होता. काल दि. २७ फेब्रुवारी रोजी रात्री आ. राजासिंग याच्या विरोधात १५३ अ, १५३ बव २९५ (अ) व ५०५ भादंवि प्रमाणे एकट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाणे हे अधिक तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment