कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा सुरू
विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष सुधाकर तेलंग यांची माहितीलातूर : माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाचे लातूर विभागीय अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी वरिष्ठांचा मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावी व बारावी परीक्षा सुरळीत व शांततेत पार पाडत असल्याबद्दल त्यांचा राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाकडून संकुलाचे प्रमुख प्राचार्य डी. एन. केंद्रे यांच्या हस्ते मंगळवारी सत्कार करण्यात आला. तसेच सुधाकर तेलंग यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी रामदास पवार, प्रकाश देशमुख, मंडळाचे सहसचिव एम. सी. फडके, सहायक सचिव आर. ए. कुंभार, लेखाधिकारी आर. टी. घोलप, जी. आर. बिदरकर, एम. यू. डाळींबे, एस. एल. राठोड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तेलंग म्हणाले, लातूर, नांदेड व उस्मानाबाद जिल्याच्या लातूर विभागीय शिक्षण मंडळातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत सुरू आहेत. आतापर्यंत कुठलाही अनुचित प्रकार आढळून आला नाही. मंडळातील परीक्षा भयमुक्त पार पाडण्यासाठी या तिन्ही जिल्ह्यातील प्रशासनाने पुरेपूर योगदान मिळत आहे, असे तेलंग यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एल. राठोड यांनी केले. या बैठकीस मंडळातील तिन्ही जिल्ह्याच्या विभागातील अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment