मुस्लिमांना चुकूनही मत देऊ नका; भाजप आमदाराचं वादग्रस्त विधान
कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी (Karnataka Assembly Election) भाजप आमदारानं (BJP MLA) म्हैसूरचे शासक टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केलं.
भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ (Basangouda Patil Yatnal) यांनी मुस्लिमांना टिपू सुलतानची उपमा देत मुस्लिम नेत्यांना मतं देऊ नका, असं म्हटलं. विजयपुरा येथील यत्नाल इथं एका निवडणूक सभेला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.
तुमच्या मतदारसंघात एक लाख टिपू सुलतान (Muslim voters) असल्याचं सर्व आमदार मला सांगतात, असं भाजप आमदार म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांना फॉलो करणाऱ्या विजापूरमध्ये तुम्ही निवडणूक कशी जिंकणार? यावर पाटील म्हणाले, विजापूरमध्ये टिपू सुलतानचा एकही अनुयायी निवडणूक जिंकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायीच जिंकतील. त्यामुळं चुकूनही मुस्लिम उमेदवारांना मत देऊ नका, असं आवाहनंच त्यांनी जनतेला केलं.
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीपूर्वी टिपू सुलतानचं नाव राज्यात पुन्हा एकदा चर्चेचं केंद्र बनलंय. टिपू सुलतानबद्दल विविध राजकीय पक्षांचे नेते भाष्य करत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी लोकांना टिपू सुलतानच्या कट्टर समर्थकांना मारण्यास सांगितलं. त्यांच्या वंशजांना हद्दपार करून जंगलात पाठवा, असंही ते म्हणाले.
कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सीएन अश्वनाथ नारायण यांनी या महिन्याच्या सुरुवातीला वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. उरी गौडा आणि नांजे गौडा यांनी टिपू सुलतानचा ज्या प्रकारे खात्मा केला, त्याचप्रमाणं मंड्यातील एका सभेत त्यांनी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांना संपवण्याचं बोललं होतं. या टिप्पणीवरून वाद निर्माण झाल्यानंतर नारायण यांनी त्यांच्या वतीनं स्पष्टीकरणही जारी केलं होतं. कुणालाही दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असं ते म्हणाले.
No comments:
Post a Comment