किनगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुकास्तरीय नृत्य स्पर्धा संपन्न ; ४२ स्पर्धकांनी घेतला सहभाग
अहमदपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्याकरीता तालुका स्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेचे लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघ सलग्न किनगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसीय नृत्य स्पर्धेत ४२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.यात प्रथम पारितोषिक १५००० हजार रु व सन्मान पत्र तर द्वितीय पारितोषिक ११००० हजार रु व सन्मान पत्र तर तृतीय पारितोषिक ७००० रु व सन्मान पत्र व वेशभूषा ३१०० रु पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धाचे उद्घाटन दि.१३ रोजी सायंकाळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नरसिंह घोणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानी रत्नाकर नळेगावकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सपोनि भाऊसाहेब खंदारे,पोलीस पाटील मुजफ्फर देशमुख,जेष्ठ पत्रकार उदयकुमार जोशी,धम्मानंद कांबळे,शिवराज भुसाळे,पंडीतराव बोडके,प्रा दगडू सिरसाट आदी जण होते.
तर बक्षिस वितरण कार्यक्रमास माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव,भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके,माजी आमदार बब्रुवान खंदाडे,माजी सभापती अयोध्या केंद्रे,सहसंचालक राम डिगांबर दहिफळे,भाजपा तालुका अध्यक्ष हणमंत देवकते आदी जण होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अफजल मोमीन होते.
तालुका स्तरीय नृत्य स्पर्धेचे प्रथम पारितोषिक माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते चंद्रा या गीतास स्नेहा परमेश्वर पौळ व पदमजा गोरटे यांना देण्यात आले तर द्वितीय पारितोषिक भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या हस्ते आदिवासी गीत सिद्धेश्वर देवदे व कोरोना वर आधारीत गीत असलेल्या जिल्हा परिषद प्रशाला किनगावला देण्यात आले तर तृतीय पारितोषिक माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या हस्ते जलवा या गीतास व भगवान विद्यालयाच्या आंबे कृपा करी या गीतास देण्यात आले.तर वेशभूषा पारितोषिक शिवराज भुसाळे यांच्या वतीने प्रतीक उपाडे यांच्या ग्रुपला देण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन किनगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष गोरख भुसाळे,उपाध्यक्ष असलंम शेख,सचिव जाकेर कुरेशी,सहसचिव अन्वर बागवान,माजी अध्यक्ष शेटिबा शृंगारे,रोकडोबा भुसाळे,शाम सावंत यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक जाकेर कुरेशी यांनी तर सूत्रसंचालन प्रा बालाजी आचार्य व संजीवकुमार देवनाळे तर आभार बस्वराज हुडगे यांनी मानले.
Tags
लातूर