ही तर नोरा पेक्षाही भारी नाचतेय
काही दिवसांपूर्वी बेली डान्स करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला होता. जवळपास १ कोटींपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी तो जबरदस्त डान्स पाहिला होता. त्याच तरुणीचा आता आणखी एक व्हिडीओ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये देखील ती जबरदस्त बेली डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिचं प्रचंड कौतुक करतायेत. काही जणांनी तर तिची तुलना चक्क लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीची सुद्दा केली आहे. (फोटो सौजन्य - kkhushii_sharma/Instagram)
तरुणीच्या डान्सची होतेय नोराशी तुलना

या डान्सर तरुणीचं नाव खुशी शर्मा असं आहे. तिच्या या व्हिडीओनं इंटरनेटवर जणू आगच लावलीये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बेली डान्स म्हणताच क्षणी आपल्या डोळ्यांसमोर पहिल्यांदा येते ती नोरा फतेही. देशभरातील करोडो लोक तिच्या बेली डान्सचे फॅन आहेत. पण ही तरुणी देखील कमी नाही. पुष्पा चित्रपटातील ऊ अंटावा या गाण्यावर तिनं केलेला डान्स पाहून नेटकरी तिचे फॅन झाले आहेत. तिची तुलना मोठमोठ्या बॉलिवूड अभिनेत्रींशी करत आहेत. तिचा हा व्हिडीओ ६ लांखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. व तसंच पाहण्यांची संख्या मिनिटागणिक वाढत चालली आहे. तुम्हाला हा डान्स कसा वाटला? तुम्ही देखील आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. (फोटो सौजन्य - kkhushii_sharma/Instagram)