दिवसभरातील ताज्या घडामोडी - latursaptrangnews

Breaking

Monday, February 27, 2023

दिवसभरातील ताज्या घडामोडी







 आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात :


शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात बसले. आदित्य ठाकरेंनी चूक निदर्शनास आणल्यानंतर नार्वेकर बाहेर गेले. सुरक्षारक्षकांनी नार्वेकरांना सभागृहात कसे सोडले? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मात्र प्रेक्षक गॅलरी समजून चुकून सेंट्रल हॉलमध्ये जाऊन बसलो असे म्हणत नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिले आहे. 


😇 महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला : राज ठाकरे :


सध्या कुठला आमदार कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही. पूर्वी सगळ्या गोष्टी आमने-सामने व्हायच्या. असा महाराष्ट्र कधीही नव्हता. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. साऱ्या राजकीय परिस्थितीवर 22 मार्चला गुढीपाडव्याच्या सभेत सिनेमा दाखवणार आहे, असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला.


👍 वॉकर घेऊन जयकुमार गोरे विधानभवनात :


राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप आमदार जयकुमार गोरे वॉकर घेऊन सभागृहात आले. तब्येतीपेक्षा मतदारसंघातील समस्या आणि लोकांना न्याय मिळवून देणे महत्त्वाचे असल्यामुळे अधिवेशनाला आल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले. त्यामुळे गोरे यांच कौतुक केलं जातं आहे.


😎 अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पटोलेंचा घणाघात :


नवनिर्वचित राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांसदर्भात राज्यात सध्या अनेक प्रश्न उपस्थित असताना राज्यपाल रमेश बैस आपल्या अभिभाषणातून शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांना धीर देणार असल्याचं वाटलं, पण हे शेतकरीविरोधी सरकार असल्याचा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.


🗣️ तुमच्या पक्षात सगळेच संत महात्मे आहेत का? :


ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही पत्रकार परिषदेत सरकारला धारेवर धरत घणाघाती टीका केली आहे. राऊत म्हणाले, की ‘दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना अटक होणार हे खुद्द अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया स्वतः सांगत होते. अशा कारस्थानांचा सुगावा आता विरोधकांनीही लागतो. मी सुद्धा सांगत होतो की मला अटक होणार आहे. सध्याचे देशातील वातावरण आणीबाणीपेक्षाही भयंकर होत आहे.’ तुमच्या पक्षात सगळेच संत-महात्मे भरले आहेत का? असा सवाल त्यांनी भाजपला केला.


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment