मुरुड व परिसरातील अवैध धंदे बंद करण्यात यावे - लहुजी शक्ती सेनेची मागणी
मुरुड (प्रतिनिधी) मुरुड शहर हे दिवसेंदिवस अवैध धंद्याचे माहेरघर बनत असून शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून, यामुळे तरुणपिढी व्यसनाधिनतेकडे वळत असल्याने प्रशासनाने लक्ष घालून अवैध धंदे बंद करावे, अशा मागणीचे निवेदन लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मुरुड पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.
शहरामध्ये दारूचे अड्डे तर हे अगदी पावला पावलावर झालेले असताना देखील प्रशासनाच्या निदर्शनास येत नाहीत शासन मान्यता नसतानाही अनेक ठिकाणी दारू,मटका,गुटखा,असे अवैध धंदे सुरू केले आहेत. व्यसनाधिनतेच्या आहारी जाऊन गोर-गरीब कुटुंब आर्थिक अडचणीत येत आहेत. मात्र, यावर संबंधित विभागाचे नियंत्रण नसल्याने व्यवसाय राजेरोसपणे सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन लहुजी शक्ती सेनेच्या वतीने दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मुरुड पोलीस स्टेशनचे एपीआय ढोणे यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी लहुजी शक्ती सेनेचे यु.ता.अध्यक्ष अक्षय चव्हाण, वि.जिल्हाध्यक्ष अक्षय वाघमारे, अनिकेत हजारे, सतीश मिसाळ, दत्ता कांबळे ,कृष्णा भालेकर सचिन मस्के कुणाल चव्हाण,मयुर कांबळे, शुभम चव्हाण ,लक्ष्मण चव्हाण ,आकाश कांबळे, राहुल कांबळे,इ. कार्यकर्ते उपस्थित होते
No comments:
Post a Comment