दिवसभरातील ताज्या घडामोडी



 😎 चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे उमेदवार :


चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे हे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते, अशी नाना काटे यांची ओळख आहे. ते पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या नगरसेवक आहेत.


💁‍♂️ तांबे प्रकरणावर नाना पटोलेंचं मोठं विधान :


नाना पटोले म्हणाले, 10 जानेवारील प्रदेश नागपूरला प्रदेश कार्यकारणीची बैठक पार पडली होती. तेव्हा संघटना सचिवांना एबी फॉर्म देण्यास सांगितलं होतं. त्यानुसार फॉर्म देण्यात आला होता; पण तो नागपूरचा असल्याचं समोर आलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 तारखेला बाळासाहेब थोरातांचे जवळील व्यक्ती मनोज शर्मांकडे दुसरा फॉर्म पोहचवण्यात आला.


👀 चंद्रशेखर बावनकुळे यांची थोरातांना खुली ऑफर :


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, बाळासाहेब थोरातच नाही तर कोणालाही पक्षात यायचे असेल तर भाजपचे दरवाजे उघडे आहेत. ते जर आले तर त्यांचा योग्य सन्मान राखू, काँग्रेसमध्ये त्यांच्या असलेल्या उंची पेक्षा मोठे स्थान त्यांना देऊ असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.


🗣️ महाराष्ट्राचे नवे राज्यपाल नारायण राणे झाले तर... :


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी लवकरच पदमुक्त होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार?, याची उत्सुकता असतानाच आता या पदासाठी नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी यावर मिश्किल भाष्य केले. संजय राऊत म्हणाले, नियमानुसार नारायण राणे महाराष्ट्राचे राज्यपाल होऊ शकत नाही. तरीही नारायण राणे यांचे नाव राज्यपाल पदासाठी पुढे आले तर आम्ही या नावाचे स्वागत करू. मजा येईल.


⚡ योगी आदित्यनाथ धर्मगुरू नव्हे ठग : राहुल गांधी :


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ धर्मगुरू नव्हे तर ठग असल्याची तिखट टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. राहुल यांनी सोमवारी दिल्लीतील सामाजिक संघटनांशी संवाद साधताना ही टीका केली. कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये झालेल्या या बैठकीत स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादवही उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post