कॉंग्रेसमधील अंतर्गत कलहामुळेच राहुल गांधी पंतप्रधान पदापासून दूर! - latursaptrangnews

Breaking

Tuesday, February 7, 2023

कॉंग्रेसमधील अंतर्गत कलहामुळेच राहुल गांधी पंतप्रधान पदापासून दूर!

 कॉंग्रेसमधील अंतर्गत कलहामुळेच राहुल गांधी पंतप्रधान पदापासून दूर!

इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचा दावा

 



मुंबई फेब्रुवारी २०२३

देशातील सर्वात जुना पक्ष असलेला कॉंग्रेस सध्या त्यांचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी झटत आहे.पक्षातील मातब्बर नेत्यांमध्ये सुरू असलेले गटातटाचे राजकारण याकरीत कारणीभूत आहे.पक्षातील अंतर्गत गटबाजीने राहुल गांधी यांना पंतप्रधान पदापासून दूर ठेवले आहे,असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी केला.

कॉंग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे महाराष्ट्रात पक्षाचे पानिपत होत आहे.शिक्षक मतदार संघात बंडखोरी करणारे कॉंग्रेस नेते सत्यजित तांबे निवडून आले आहे.अशात कॉंग्रेसची स्थिती बुडत्या जहाजासारखी झाली आहे.पक्षाचे जेष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात समन्वय नाही.अशात केवळ सत्ताप्राप्तीसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर अवलंबून राहणे कॉंग्रेसच्या प्रतिमेला तडे देणारे आहेत.पक्षाचे केंद्रीय सुत्रे एकाहाती नसल्याने पक्षात विक्रेंद्रीकृत नेतृत्व उदयाला येत आहेहिमाचल प्रदेशमध्ये देखील भाजपविरोधातील लाटेमुळे कुठलेही विशेष प्रयत्न  करता कॉंग्रेस सत्तेवर आले.या राज्यात भाजपने थोडे अधिक प्रयत्न केले असते तर कदाचित हिमाचल मधील सत्ता त्यांना टिकवता आली असती.

वर्षभरात राजस्थानकर्नाटकमध्यप्रदेशछत्तीसगढ सह इतर राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहे.या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला प्रभावी नेतृत्वाची गरज आहे२०२४ मध्ये होवू घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीपुर्वीचा हा अंतिम सामना असल्याने यात चांगली कामगिरी करीत इतर राज्यांमध्येही सत्ता काबीज करण्याचा मानस कॉंग्रेसचा आहेपंरतुउत्कृष्ठ नेतृत्व कौशल्यसंघटन बांधणी आणि आपसातील हेवेदावे विसरल्याशिवाय कॉंग्रेसला यशाचा मार्ग गवसणार नाहीअसे मत पाटील यांनी व्यक्त केलेया राज्यात मिळणाऱ्या यशाच्या भरवश्यावरच राहुल गांधी यांची पंतप्रधान पदावरील दावेदारीचे भवितंव्य अवलंबून आहेअसे मत पाटील यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment