अवैध गर्भपात प्रकरणाने औरंगाबादेत खळबळ
औरंगाबाद : अवैद्य गर्भपात प्रकरण उघडकीस आल्याने औरंगाबाद येथे एकच खळबळ उडाली आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन येथील रुग्णालयात गेल्या तीन ते चार वर्षांपासून अवैधरित्या गर्भपात करण्यात येत असल्याचे समोर आले. यानंतर दवाखाना चालवणाऱ्या डॉक्टर दांपत्याविरोधात बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. सोनाली उद्धव काळकुंबे आणि अमोल जाधव, असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे.
प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपी डॉक्टर दाम्पत्याला अद्याप अटक केलेली नाही. हे दाम्पत्य फरार आहे. या डॉक्टर दाम्पत्याच्या शोधासाठी पोलिसांचं पथक रवाना करण्यात आलं आहे. दुसरीकडे, आरोग्य विभागाने आणि पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकत कारवाई केली. यात रुग्णालयातील औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
Tags
महाराष्ट्र