मुंबई, दि. 17: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर शनिवार दि. 18 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.
शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले. रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. त्यांनी आपले आचरण, विचारांमधून समाजासमोर आदर्श निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुण पिढीने अंगीकार करून प्रत्यक्ष आचरणात आणल्यास हीच खरी त्यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना ठरेल, असा संदेश डॉ. आसबे यांनी आपल्या व्याख्यानातून दिला आहे.
000
जयश्री कोल्हे/स.सं
from महासंवाद https://ift.tt/DluGjrp
via IFTTT https://ift.tt/1LKUknI