मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचे तिकिटाचे दर, पहा रेल्वेचा रूटमॅप, वेळापत्रक - latursaptrangnews

Breaking

Sunday, February 5, 2023

मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचे तिकिटाचे दर, पहा रेल्वेचा रूटमॅप, वेळापत्रक

 मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचे तिकिटाचे दर, पहा रेल्वेचा रूटमॅप, वेळापत्रक



Vande Bharat Express : मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस 10 फेब्रुवारी रोजी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मुंबई दौऱ्यात या ट्रेनची सुरुवात करणार आहेत.

दरम्यान आज आपण मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दराविषयी, रूट मॅप विषयी तसेच वेळापत्रकाविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ नाही दवडता जाणून घेऊया या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रक :- 

सोलापूर ते मुंबई असा राहणार प्रवास :- सोलापूर येथून सकाळी 06:05 मिनिटांनी ही रेल्वे सुटेल 9 वाजता पुणे येथे पोहचेल आणि दुपारी 12:35 वाजता सीएसएमटीला म्हणजे मुंबईला पोहोचणार आहे.

मुंबई ते सोलापूर असा राहणार प्रवास :- सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी मुंबईहून निघाल्यानंतर सात वाजून 30 मिनिटांनी ही रेल्वे पुण्यात दाखल होईल अन मग रात्री दहा वाजून 40 मिनिटांनी ही रेल्वे सोलापूरला पोहोचेल.

या दिवशी धावणार :- मुंबईहून बुधवारी आणि सोलापूरहून गुरुवारी ही रेल्वे धावणार नाही.

या ठिकाणी राहणार थांबे :- मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस दादर, ठाणे, लोणावळा, पुणे, कुर्डुवाडीला थांबा घेणार अशी माहिती एका मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून हाती आली आहे.

असे राहतील टिकीटाचे दर :- मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवास करण्यासाठी चेअर कार साठी 900-1100 रुपये आणि एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी 1900-2200 रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे. 









No comments:

Post a Comment