दिवसभरातील ताज्या घडामोडी
📣 *मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय*
आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आपलं मत व्यक्त केलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृह इथं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात आणखी प्रबळपणे मांडण्यासाठी, तसेच न्यायालयीन लढ्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल.
😎 *काँग्रेसकडून रोहित टिळकांच्या नावाचा विचार सुरु...*
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल असे चित्र होते. त्यामुळे काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांनी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले नाही. मात्र, आता भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे रोहित टिळक यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केल्याची सूत्रांची माहीती आहे.
💐 *पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन!*
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन झाले आहे. दुबईतील रुग्णालयात दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. मुशर्रफ यांना हृदय आणि इतर वयोमानानुसार आरोग्याच्या समस्या होत्या. परवेझ मुशर्रफ यांनीच तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना न सांगता भारताविरुद्ध कारगिल युद्ध सुरू केले होते.
🚨 *माजी क्रिकेटपटू विनोद कांबळींवर गुन्हा दाखल*
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यावर त्यांच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. मद्यप्राशन करून विनोद कांबळी यांच्याकडून मारहाण तसेच शिवीगाळ केल्याचे कांबळी यांच्या पत्नी अँड्रिया यांनी म्हटले आहे. याच कारणामुळे अँड्रिया यांनी कांबळी यांच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनीही कांबळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
🏏 *ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, स्टार खेळाडू पहिल्या कसोटीतून बाहेर*
सोमवारी ऑस्ट्रेलियन टीम नागपूरला रवाना होईल. पण नागपूरमध्ये दाखल होण्याआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसलाय. टीमचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडला दुखापत झालीय. त्यामुळे तो पहिल्या कसोटीत खेळणार नाहीय. आपल्या टॉप वेगवान गोलंदाजाशिवाय खेळणं, ऑस्ट्रेलियासाठी सोपं नसेल.