आमदार राजासिंह ठाकूर यांच्याकडून शिवजयंती सोहळ्यात आक्षेपार्ह वक्तव्य ! मराठा क्रांती मोर्चा व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कारवाईची मागणी

 

आमदार राजासिंह ठाकूर यांच्याकडून शिवजयंती सोहळ्यात आक्षेपार्ह वक्तव्य ! मराठा क्रांती मोर्चा व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कारवाईची मागणी



लातूर: दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या दुचाकी रैलीच्या येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या समारोप कार्यक्रमात बोलताना शेजारच्या तेलंगणा राज्यातील आ. टी. राजा यांनी केलेल्या जातिवाचक वक्तव्याचा लातूर मराठा क्रांती मोर्चा व राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर निषेध करीत आ. टी. राजा यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. महापुरुषांच्या स्मारकांचा वापर धार्मिक भावना भडकविण्यासाठी व राजकीय उद्देशासाठी करू नये, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.

लातूर हे सर्व धर्म समभाव मानणारे पुरोगामी व एकतेचे। प्रतीक असणारे शहर आहे. अशा शहरात शिवजयंती सोहळ्यात आ. टी. राजा यांनी छत्रपती शिवरायांचा चुकीचा इतिहास सांगितला असून त्यांनी शिवचरित्राचा अभ्यास केला नसावा अशी शंका व्यक्त करीत जातिवाचक व धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी आ. टी. राजा यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी विविध राजकीय पक्ष संघटनांकडून होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद सावे,अँड. व्यंकट बेद्रे, प्रशांत पाटील, समीर शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांची भेट घेवून आ. टी. राजा यांच्यासह त्यांना बोलावून कार्यक्रम घेणाऱ्या आयोजकांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे. आ. टी. राजा यांच्या चुकीच्या वक्तव्याने लातूरच्या शांतताप्रीय व सुसंस्कृत वातावरणाला गालबोट लागले आहे. म्हटले आहे.

त्यांच्या या विधानाची दखल आयोजकांनी घेणे गरजेचे आहे. यापुढे अशा घटना लातूरसारख्या शांतताप्रीय शहरात होऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त करीत आ. टी. राजा यांनी लातुरात केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करावी, असे मराठा क्रांती मोर्चाने प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहेत

Post a Comment

Previous Post Next Post